Hardik Pandya : हार्दिक की बेन स्टोक्स जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू ? पाकिस्तानचा माजी कर्णधार म्हणतो…

| Updated on: Sep 23, 2022 | 7:15 AM

हार्दिक की बेन स्टोक्स जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू अशी सद्या जोरदार चर्चा सुरु आहे.

Hardik Pandya : हार्दिक की बेन स्टोक्स जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू ? पाकिस्तानचा माजी कर्णधार म्हणतो...
हार्दिक की बेन स्टोक्स जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू ?
Image Credit source: twitter
Follow us on

हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) आपल्या अष्टपैलू खेळीने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. आशिया चषकात (Asia cup 2022) सुद्धा हार्दीक पांड्याने काही सामन्यात चांगली कामगिरी केली. त्यांच्याकडे एक हाती विजय मिळविण्याची ताकद आहे. त्याचबरोबर भारतात झालेल्या आयपीएलच्या (IPL 2022) क्रिकेट स्पर्धेत सुद्धा तो आघाडीवर होता. त्यांची खेळी अतिशय सुंदर असल्याने देशभरात त्याचे चाहते आहेत.

दोन दिवसांपुर्वी ज्यावेळी मोहालीमध्ये ज्यावेळी ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियाची पहिली मॅच झाली. त्यावेळी टीम इंडियाने 208 इतकी मोठी धावसंख्या उभारली होती. त्या सामन्यात सगळ्यात मोठी भागीदारी होती, ती म्हणजे हार्दीक पांड्याची, त्यामुळे पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषकात तो चांगली कामगिरी करेल अशी चाहत्यांमध्ये चर्चा आहे.

हार्दिक की बेन स्टोक्स जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू अशी सद्या जोरदार चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर दोन्ही बाजूंच्या चाहत्यांच्या कमेंट वाचायला मिळत आहेत.

हे सुद्धा वाचा

विशेष म्हणजे पाकिस्तानचा माजी कर्णधार रशीद लतीफने स्वतःच्या यूट्यूब चॅनलवर या विषयावर आपले मत उघडपणे मांडले आहे.

आत्तापर्यंत हार्दीक पांड्याने चांगली पारी खेळली आहे. तसेच बेन स्टोक्सने सुद्धा त्यांच्या टीमला विश्वचषक जिंकून दिला आहे. त्याचबरोबर अनेक कसोटीसह चषक सुद्धा जिंकून दिले आहेत. त्यामुळे त्यांची हार्दीकशी तुलना करणं योग्य नाही असं म्हटलं आहे.