Photo : बायको नताशाच्या ब्लॅक बिकिनीत मादक अदा, हार्दिक पांड्या फिदा, कमेंट करुन म्हणाला…
नताशाच्या मादक अदांवर हार्दिक नेहमीच फिदा होत असतो. तिच्या व्हिडीओ आणि फोटोंवर सोशल मीडियावरुन हार्दिक नेहमीच कमेंट करताना दिसून येतो. (hardik pandya Comment on Wife natasa Stankovis bikini photo)
1 / 6
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik pandya) आपल्या बॅटिंगने तर चर्चेत असतोच परंतु त्याच्या पत्नीच्या अनेक हॉट फोटोमुळेही तो अनेकदा चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. त्याची पत्नी नताशा स्टेनकोविकने (Natasa Stankovic) बिकीनीमधला एक हॉट फोटो शेअर केलाय.
2 / 6
पत्नी नशाशाच्या ब्लॅक बिकिनीमधील हा हॉट फोटोवर हार्दिकने कमेंट केलीय. नताशाचा हा फोटो पाहून त्याला कमेंट केल्याशिवाय रहावलं नाही. आग आणि हर्ट इमोजी पोस्ट करत फोटो आवडल्याचं त्याने एकप्रकारे कमेंटमधून सुचित केलंय.
3 / 6
नशानाने शेअर केलेल्या फोटोंवर त्यांच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडलाय. नेटकऱ्यांनी नताशाच्या रोमँटिंक अंदाजाची तारीफ केली आहे
4 / 6
हार्दिकची पत्नी सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. क्षणाक्षणाची माहिती ती आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे देत असते. कधी तिचे एकटीचे तर कधी हार्दिकसोबतचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. या फोटोंमधून तिची हार्दिकबरोबरची रोमँटिक केमिस्ट्री नेहमीच दिसून येत येते.
5 / 6
हार्दिक आणि नताशा हे सेलिब्रेटी कपल आहे. नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे ही जोडी चर्चेत असते. गेल्याच वर्षी त्यांनी एका बाळाला जन्म दिला आहे. त्या बाळाचं नाव त्यांनी अगस्त्य ठेवलं आहे.
6 / 6
नताशाच्या मादक अदांवर हार्दिक नेहमीच फिदा होत असतो. तिच्या व्हिडीओ आणि फोटोंवर सोशल मीडियावरुन हार्दिक नेहमीच कमेंट करताना दिसून येत आहे.