मुंबई : इंग्लंडविरुद्धची (India Vs England) मालिका यशस्वीपूर्ण पार पाडत भारताचे खेळाडू आयपीएलच्या (IPL 2021) 14 व्या मोसमासाठी आपापल्या फ्रेंचायजीच्या कॅम्पसाठी रवाना होत आहेत तर काही खेळाडू कॅम्पमध्ये दाखल आहेत. मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) सिक्सर किंग हार्दिक पांड्या (Hardik Pandya), क्रुणाल पांड्या (Krunal Pandya) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) मुंबईच्या कॅम्पमध्ये दाखल झाले आहेत. मुंबई इंडियन्स फ्रेंचायजीने ट्विट करुन तशी माहिती दिली आहे. (Hardik Pandya Krunal Pandya And Suryakumar Yadav Join MI Camp In Mumbai)
Pune ➡️ Mumbai and our boys have arrived at the @RenaissanceMum! ?
Drop a ? if you can’t wait to see them in action at the #IPL2021 ?#OneFamily #MumbaiIndians @hardikpandya7 @krunalpandya24 @surya_14kumar @MarriottBonvoy pic.twitter.com/zFE7dsyehg
— Mumbai Indians (@mipaltan) March 29, 2021
मुंबईचा सलामीचा सामना विराटच्या रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध चेन्नईच्या चेपॉक मैदानावर पार पडणार आहे. तत्पूर्वी मुंबई इंडियन्सच्या सराव शिबिराला सुरुवात झाली आहे. टीममधील आक्रमक आणि कोणच्याही क्षणी मॅच फिरवण्याची क्षमता असलेले पांड्या ब्रदर्स आणि मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात षटकार खेचण्याची कला असलेला सूर्यकुमार यादव मुंबईच्या कॅम्पमध्ये दाखल झाले आहेत.
The boys have come home! ?
Hardik, Surya and Krunal checked in at the @RenaissanceMum last night ✅#OneFamily #MumbaiIndians #IPL2021 @hardikpandya7 @surya_14kumar @krunalpandya24 @MarriottBonvoy pic.twitter.com/zWJ5Sfb6vy
— Mumbai Indians (@mipaltan) March 29, 2021
हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांनी इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत धडाकेबाज कामगिरी केली. हार्दिकने एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत आपल्या बॅटची जादू दाखवली तसंच भारताच्या मालिका विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. पुण्यातील अखेरच्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला 7 धावांनी पराभूत करत एकदिवसीय सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली.
इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात आक्रमक फलंदाज क्रुणाल पांड्याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पदार्पण केलं. केवळ 27 चेंडूत अर्धशतक झळकवण्याचा पराक्रम त्याने केला. त्याच्या खेळीबद्दल अनेकांनी त्याचं कौतुकही केलं. परंतु दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने बोलिंग करताना 6 ओव्ह्रर्समध्ये 72 रन्सची खिरापत वाटली. त्यामुळे त्याला टीकेलाही सामोरे जावे लागले.
9 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी विविध संघांचे कॅम्प सुरु झाले आहेत. मुंबई इंडियन्सचं सराव शिबीर मुंबईतच आयोजित करण्यात आलंय. त्याचनुसार रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये दाखल झाला आहे. रोहितने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन आपण मुंबई इंडियन्स संघाच्या शिबीरात दाखल झाल्याची माहिती दिली आहे.
(Hardik Pandya Krunal Pandya And Suryakumar Yadav Join MI Camp In Mumbai)
IPL 2021 : मुंबईला सहाव्यांदा चॅम्पियन करण्याचा निर्धार, रोहित शर्मा मुंबईच्या कॅम्पमध्ये दाखल!https://t.co/MdAG3MAso2#MumbaiIndians #MI #RohithSharma #IPL2021 #IPL
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 30, 2021
हे ही वाचा :
IPL 2021 : मुंबईला सहाव्यांदा चॅम्पियन करण्याचा निर्धार, रोहित शर्मा मुंबईच्या कॅम्पमध्ये दाखल!
IPL 2021 : RCB चे दिग्गज चेन्नईला जमायला सुुरुवात, विराट या दिवशी कॅम्पसाठी रवाना होणार!