अबुधाबी : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील 20 वा सामना (6 ऑक्टोबर) आज खेळण्यात येणार आहे. हा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्यात मुंबईचा कर्णधार हिटमॅन रोहित शर्माला (Hitman Rohit Sharma) मिस्टर आयपीएल सुरेश रैनाचा (Mister Ipl Suresh Raina) विक्रम मोडित काढण्याची संधी आहे. ही कामगिरी करताच रोहित शर्मा आयपीएल स्पर्धेतील पहिला भारतीय फलंदाज ठरणार आहे. रोहित शर्मा यंदाच्या मोसमात चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे राजस्थान विरुद्धच्या सामन्यात क्रिकेटचाहत्यांना रोहितकडून दमदार खेळीची अपेक्षा असणार आहे. (Rohit Sharma chance to break Suresh Raina Record)
आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतकांच्या बाबतीत भारतीय खेळाडूंमध्ये सुरेश रैना आणि रोहित शर्मा अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे. रैनाच्या आणि हिटमॅनच्या नावावर 38 अर्धशतकांची नोंद आहे. मात्र रोहितच्या तुलनेत रैनाच्या धावा जास्त आहेत. त्यामुळे रैना पहिल्या आणि रोहित दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे रोहितने राजस्थान विरुद्धच्या सामन्यात अर्धशतकी खेळी केल्यास, तो सर्वाधिक अर्धशतकं लगावणारा पहिला भारतीय खेळाडू ठरेल.
रोहितच्या नावावर टी 20 मध्ये 8 हजार 818 धावांची नोंद आहे. रोहितने 333 सामन्यातील 320 डावात ही किमया केली आहे. यात रोहितने 6 शतकं आणि 62 अर्धशतकं लगावले आहेत. तसेच रोहितने 776 चौकार आणि 372 सिक्स लगावले आहेत. तर 118 ही रोहितची टी 20 मधील सर्वोच्च खेळी आहे. मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) आयपीएलच्या (IPL 2020) साखळी फेरीतील 9 सामने खेळायचे आहेत. त्यामुळे रोहितला टी 20 मध्ये 9 हजार धावा पूर्ण करण्याची नामी संधी आहे.
दरम्यान रोहितने आयपीएलच्या या मोसमात काही विक्रम केले आहेत. यामध्ये त्याने षटकारांचं द्विश्तक पूर्ण केलं आहेत. यासोबतच आयपीएल कारकिर्दीतील 5 हजार धावाही पूर्ण केल्या आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतकांच्या यादीत सनरायजर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) कर्णधार अव्वल क्रमांकावर आहे. डेव्हिड वॉर्नरच्या (David Warner) नावावर सर्वाधिक 45 अर्धशतकांची नोंद आहेत.
संबंधित बातम्या :
IPL2020: हिटमॅन रोहित शर्मा पाचहजारी मनसबदार, आयपीएलमध्ये भन्नाट कामगिरी
IPL 2020, KKR vs MI | आयपीएल कारकिर्दीत हिटमॅन रोहित शर्माचं षटकारांचं द्विशतक
IPL 2020, RCB vs DC : विराटची ‘विराट’ कामगिरी, ठरला पहिला भारतीय फलंदाज
(Hitman Rohit Sharma chance to break Suresh Raina Record)