जगात क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या बातम्या एकदम फास्ट व्हायरल (Viral News) होतात. त्यामध्ये सत्य आणि असत्य पडताळून पाहिलं जात नाही. कारण त्यामुळे त्याची चर्चा सुद्धा अधिक होते. पाकिस्तानच्या खेळाडूचा (Pakistan Player) मृत्यू झाल्याची व्हायरल झाली आहे. नेमकी ही बातमी व्हायरल कुणी केली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु त्या खेळाडूला ही बातमी चुकीची असल्याचं सांगावं लागलं आहे. ज्यावेळी पाकिस्तान खेळाडूने ट्विट (Tweete) केलं, त्यावेळी चाहत्यांनी चर्चा बंद केली आहे.
Me belkul thek ho Allah ka shukar hai mery pory family ko log calls kr rahy hai with due respect itni bari News chalany se pehly tasdeeq kar liya kary shukria?
हे सुद्धा वाचा— Usman khan shinwari (@Usmanshinwari6) September 25, 2022
पाकिस्तानचा बॉलर उस्मान शिनवारी सोशल मीडिया शिकार झाला आहे. त्याचा मृत्यू झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ज्यावेळी त्याच्या हे कानावर गेले. त्यावेळी त्याने मी एकदम तंदुरुस्त असून पुर्णपणे ठीक आहे, तसेच मी देवाचे सुद्धा आभार मानतो असं ट्विट केलं आहे.
लाहोरमधील चोबली टाऊन क्रिकेट मैदानावर फ्रिजलँड आणि बर्गर पेंट्स यांच्यातील लीग मॅच दरम्यान ‘शिनवारी’ नावाच्या खेळाडूचा मृत्यू झाला. त्यानंतर पाकिस्तानमधील लोकांचा असा गैरमसज झाला की, उस्मान शिनवारी याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानमधील चाहत्यांनी त्याला श्रध्दांजली व्हायला सुरुवात केली होती.
उस्मान शिनवारीने पाकिस्तानच्या टीमसाठी आत्तापर्यंत 17 एकदिवसीय आणि 16 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यानावावर 13 विकेट देखील आहेत. शिनवारी 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय सामने खेळला होता.