मुंबई : इंग्लंडच्या (England) टीमचं विश्वचषक (T20 World Cup 2022) जिंकल्यापासून कौतुक सुरु आहे. विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडच्या खेळाडूंनी सांघिक चांगली खेळी केली. त्यामुळे त्यांनी विश्वचषक जिंकला अशी सोशल मीडियावर कालपासून चर्चा सुरु आहे. कालचा सामना रोमांचक होईल असं चाहत्यांना वाटतं होतं. परंतु पाकिस्तान टीमच्या (Pakistan Team) खेळाडूंना इंग्लंडविरुद्ध चांगली खेळी करता आली नाही. त्यामुळे पाकिस्तान टीमचा पराभव झाला. फायनल मॅचमध्ये बेन स्टोक्सने 52 धावा करीत इंग्लंड टीमला विजय मिळवून दिला. आयलॅंड टीमविरुद्ध ज्यावेळी इंग्लंडचा पराभव झाला होता, त्यावेळी बेन स्टोक्सला अधिक दुख झालं होतं. पुढच्या सामन्यात विजय मिळवून आम्ही पुनरागमन केल्याचं बेन स्टोक्ससने सांगितले.
कालच्या सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी केली, त्यामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंना मोठे फटके मारता आले नाहीत. पाकिस्तान टीमची धावसंख्या मर्यादीत राहिली. इंग्लंडच्या फलंदाजांनी चांगली खेळी केली आणि सामना एकहाती जिंकला.
T20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना मेलबर्नच्या मैदानात झाला. त्यावेळी दुखापतीतून सावरलेल्या सॅम कुरन याने चार षटकात 12 धावा दिल्या. विशेष म्हणजे विश्वचषक स्पर्धेत त्याने 13 विकेट घेतल्या विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे त्याला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’पुरस्काराने सन्मानित केले.
ज्यावेळी ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ पुरस्कारासाठी सॅम कुरनचं नाव घेण्यात आलं. त्यावेळी तो म्हणाला की, “आजच्या मॅचचा मानकरी दुसरा खेळाडू आहे. मला नाही वाटत की हे मला मिळायला पाहिजे होतं. ज्या पद्धतीने स्टोक्स खेळला, त्यांच्या खेळाचा आम्ही पुरेपूर आनंद घेतला.”
“पाकिस्तानच्या धावाचा पाठलाग करताना स्टोक्सने नाबाद खेळी केली. लोक स्टोक्सला प्रश्न विचारतात, परंतु त्याचा कोणाला प्रश्न नसतो. तो खरा माणूस आहे” असं सॅम कुरनने सांगितले.
“मी पहिल्यांदा विश्वचषक स्पर्धेत खेळत होतो. आम्ही सगळ्यांनी चांगला सांघिक खेळ केला, म्हणून आमचा विजय झाला. ज्यावेळी इंग्लंड टीम गरज असते त्यावेळी स्टोक्स चांगली खेळी करतो” असं कौतुक सॅम कुरनने केलं.