मुंबई : भारताचा स्टार खेळाडू रविंद्र जडेजा याने पहिल्या कसोटीमध्ये जबरदस्त पुनरागमन केलं आहे. रविंद्र जडेजाने पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया संघाच्या 5 विकेट्स घेत अर्धशतकही ठोकलं होतं. (Ravindra Jadeja on His Nickname) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खिशात घातला होता. स्टार खेळाडू रविंद्र जडेजाला ‘सर जडेजा’ असं निकनेम देण्यात आलं आहे. मात्र जडेजाला सर म्हटलेलं आवडत नाही. यासाठी जडेजाने एक खास नाव सांगितलं होतं.
मला माझ्या नावाने हाक मारा ते माझ्यासाठी पुरेसं आहे. ‘सर’ म्हटल्यावर मला राग येतो. मला निकनेम द्यायचंच असेल तर ‘बापू’ या नावाने हाक मारा कारण ते मला आवडतं. जेव्हा लोक मला सर जडेजा असं या नावाने हाक मारतात किंवा अशी उपाधी देतात ती मला आवडत नसल्याचं रविंद्र जडेजाने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
रविंद्र जडेजा मीडियासमोर जास्त दिसत नाही. मुलाखत दिली तरी त्यामध्ये तो जास्त काही उघडपणे काही बोलताना दिसत नाही. एकदा जडेजाला संघातून वगळण्यात आलं होतं त्यावेळी मुलाखत द्यायला नकार दिला होता. जडेजा त्यावेळी पत्रकारांना म्हणाला होता की, तुम्ही माझ्याबद्दल लिहिलं तर मला संघात परत घेतलं जाणार आहे का? असा उपरोधिक सवाल त्याने केला होता.
जडेजा दुखापतीमुळे भारतीय संघापासून दूर होता. दुखापतीमुळे जडेजा आशिया कप आणि टी-20 वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धांना मुकला होता. मात्र जडेजाना आता जबरदस्त कमबॅक केलं असून भारतीय संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूर कसोटीमध्ये सात महिन्यांनंतर पुनरागमन केलं होतं. या सामन्यात जडेजाने 7 विकेट घेण्यासोबतच 70 धावाही केल्या. सामनावीर म्हणून सामन्यामध्ये त्याला गैरवण्यात आलं होतं.
दरम्यान, 17 फेब्रुवारीपासून दिल्लीत भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये दुसरा कसोटी सामना होणार आहे. या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा मुंबईकर श्रेयस अय्यर दुखापतीमधून परतल्याने त्याला संघात जागा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादवला डच्चू दिला जावू शकतो.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, अक्षर पटेल , कुलदीप यादव , रवींद्र जडेजा , मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज आणि उमेश यादव.
ऑस्ट्रेलिया संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), डेविड वॉर्नर, एश्टोन एगर, स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, पीटर हॅंडस्कॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लांस मॉरिस, टॉड मरफी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.