अहमदाबाद : भारताने पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडचा 7 विकेट्सने (india vs england 2nd t20i) धुव्वा उडवला. या विजयासह भारताने मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. टीम इंडियाकडून कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) सर्वाधिक नाबाद 73 धावा केल्या. पण या सामन्याचं प्रमुख आकर्षण ठरला तो पदार्पणवीर (debutant Ishan Kishan) इशान किशन. इशानने पदार्पणातील सामन्यात 32 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांसह 56 धावांची खेळी केली. पदार्पणात अशी कामगिरी करणारा तो अजिंक्य रहाणेनंतर दुसराच भारतीय ठरला. त्याला या कामगिरीसाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आले. दरम्यान, या पदार्पणाच्या सामन्यातील यशाचं श्रेय इशानने आयपीएलला (IPL) दिलं आहे. (I have faced good pacers in IPL that helped me on India debut : Ishan Kishan)
युवा फलंदाज इशान किशन म्हणाला की, आयपीएलदरम्यान जगभरातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाजांचा सामना केल्यामुळे त्याला इंग्लंडविरूद्ध निर्भयपणे खेळण्याचा आत्मविश्वास मिळाला होता. आपीएलने माझ्यातील फलंदाजाला अधिक परिपक्व केलं आहे.
किशनने सामन्यानंतर झालेल्या एका व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत सांगितले की, “नेट्समध्ये मुंबई इंडियन्स संघातील त्याचा सहकारी ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह यांच्या आव्हानाला सामोरे जावे लागत होते. हे दोन्ही जगातले सध्याचे टॉपचे जलदगती गोलंदाज आहेत. त्यांच्याविरोधात नेट्समध्ये फटकेबाजी केल्यामुळे मला आत्मविश्वास मिळाला. आयपीएलमध्ये तुम्हाला जगभरातील दर्जेदार गोलंदाजांचा सामना करावा लागतो आणि या गोलंदाजांची तुम्हाला सवय होऊ लागते. त्यामुळे मला खरोखरच मदत झाली.”
किशन म्हणाला की, “आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी, ही प्रत्येक युवा खेळाडूची अपेक्षा असते. मला ही संधी मिळाल्याने मी आनंदी आहे. टीम मॅनेजमेंटने माझ्यावर विश्वास दाखवला. मी टीम सर्कलमध्ये माझ्या भावना व्यक्त केल्या. माझ्या भावना या मनापासून व्यक्त केल्या. मी कॅप मिळाल्यानंतर फार आनंदी होतो. त्यामुळे मी मनापासून बोललो. मला जे वाटलं तसं मी व्यक्त झालो.”
“बॅटिंगआधी मी विराट आणि हार्दिक पांड्यासोबत चर्चा केली. यांनी मला आपल्या बॅटिंगचा आनंद घे. मुक्तपणे खेळ, असा सल्ला दिला. तसेच इशानने युजवेंद्र चहलचाही उल्लेख केला. सेट होण्यासाठी आवश्यक तितका वेळ घे. मुक्तपणे खेळ. आयपीएलमध्ये खेळतोस तसाच खेळ. त्यामुळे चहलने दिलेल्या सल्ल्यानुसारच आपल्याला खेळायचं आहे”, असं इशानने स्पष्ट केलं.
इशानने या सामन्यात अर्धशतक झळकावलं. अर्धशतकानंतर प्रत्येक फलंदाज हा हवेत बॅट उंचावतो. पण इशानने काही सेंकद बॅट उंचावली नाही. याबाबत चहलने इशानला प्रश्न विचारला. यावर इशान म्हणाला की ” माझं अर्धशतक झालंय याबाबत मला कल्पना नव्हती. मी अर्धशतक झाल्यानंतर सहसा बॅट उंचावत नाही. पण विराटने मला खुणावलं. अर्धशतक झाल्याची कल्पना दिली. तुझं पहिलंचं अर्धशतक आहे. मैदानातील चारही बाजूला फिरून बॅट दाखव असं विराट म्हणाला. त्यानंतर मी बॅट उंचावली”, असं इशान म्हणाला. इशानने 28 चेंडूत आपलं पहिलं वहिलं अर्धशतक पूर्ण केलं.
? Debut for India & debut on Chahal TV right away ?
DO NOT MISS: @yuzi_chahal chats up with @ishankishan51 after his superb batting performance in the 2nd T20I against England. ?? – By @RajalArora #TeamIndia #INDvENG @Paytm
Full interview ? ?https://t.co/X68QuvB55Y pic.twitter.com/iCKzbTewU1
— BCCI (@BCCI) March 15, 2021
संबंधित बातम्या :
(I have faced good pacers in IPL that helped me on India debut : Ishan Kishan)