Aus vs Ind 3rd Test | “माझ्यावरही वर्णभेदी टीका करण्यात आली होती”, अश्विनचा धक्कादायक खुलासा

| Updated on: Jan 10, 2021 | 5:00 PM

टीम इंडियाच्या मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहवर वर्णभेदी टीका करण्यात आली. त्यानंतर क्रिकेट विश्वातून या प्रकाराबाबत अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

Aus vs Ind 3rd Test | माझ्यावरही वर्णभेदी टीका करण्यात आली होती, अश्विनचा धक्कादायक खुलासा
रवीचंद्रन अश्विन
Follow us on

सिडनी : ऑस्ट्रेलिया विरोधातील तिसऱ्या सामन्यात (Aus vs Ind 3rd test Sydney)  टीम इंडियाच्या खेळाडूंवर वर्णभेदी टीका करण्यात आली. मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आणि जसप्रीत बुमराहवर (Jasprit Bumrah) सामन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी ही टीका करण्यात आली. याबाबत टीम इंडियाने तक्रार केल्यानंतर कारवाई करण्यात आली. तसेच ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाकडून (Cricket Australia)  झाल्या प्रकाराबाबत टीम इंडियाच्या खेळाडूंची माफी मागितली. माझ्यावरही मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अशाच प्रकारे वर्णभेदी टीका करण्यात आली होती, असा धक्कादायक खुलासा टीम इंडियाचा अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin)  केला आहे. (i was criticized for racism a shocking revelation by ravichandran ashwin)

अश्विन काय म्हणाला?

चौथ्या दिवसाचा खेळ संपला. यानंतर पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेत अश्विन बोलत होता. “अॅडिलेड आणि मेलबर्नमध्ये अशी स्थिती नव्हती. पण सिडनीत वर्णभेदी टीका वारंवार केली जाते. मलाही या वर्णभेदी टीकेचा सामना करावा लागला होता. ऑस्ट्रेलियातील क्रिकेट समर्थक खेळाडूंना कमीपणा दाखवतात. ते असं का करतात, हे मला माहिती नाही. पण हा प्रकार निकाली काढायला हवा”, असं अश्विनने बोलून दाखवलं. “काही समर्थक खेळाडूंवर सरार्स टीका करतात. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. याबाबत ठोस पाऊल उचलायला हंव”, असं अश्विनने म्हटलं.

अश्विन काय म्हणाला?

“सिडनीत याआधीही टीम इंडियावर वर्णभेदी टीका करण्यात आली आहे. मात्र या सर्व प्रकरणात खेळाडूच अडचणीत सापडतात. माझ्या कारकिर्दीतील हा ऑस्ट्रेलियातील चौथा दौरा आहे. याआधी काहीवेळा खेळाडूंनी प्रेक्षकांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर तेच अडचणीत येतात”, असंही अश्विन म्हणाला. दरम्यान या वर्णभेदाच्या मुद्दयावरुन टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंहने ट्विटद्वारे आपली प्रतिक्रिया दिली.

हरभजन काय म्हणाला?

“मला ऑस्ट्रेलियात खेळताना अनेकदा वाईट अनुभव आले आहेत. ऑस्ट्रेलियात फिल्डिंग करताना माझ्या कानावर अनेकदा वाईट गोष्टी पडल्या आहेत. माझ्यावर अनेकदा धार्मिक तसेच वर्णद्वेषी टीका करण्यात आली. मला ऑस्ट्रेलियातील प्रेक्षकांचा वाईट अनुभव आहे. मोहम्मद सिराजलाही अशाच टीकेचा सामना करावा लागला. मात्र ऑस्ट्रेलियाच्या प्रेक्षकांकडून टीका करण्याची ही काय पहिली वेळ नाही. या सर्व प्रकाराला आळा कसा घालणार, असा प्रश्न उपस्थित करत हरभजनने आपला संताप व्यक्त केला”

संबंधित बातम्या :

Australia vs India 3rd test | टीम इंडियाच्या खेळाडूंवर वर्णद्वेषी टीका, हरभजनचे ट्विट, म्हणाला…

Sydney Test : भारतीय खेळाडूंवर वर्णद्वेषी टीका, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा माफीनामा

(i was criticized for racism a shocking revelation by ravichandran ashwin)