KC Cariappa, files police complaint : आयपीएल 2023 मध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा हिस्सा असलेला, फिरकी गोलंदाज के.सी. करिअप्पा सध्या बराच चर्चेत आहे. करिअप्पा याने त्याच्या गर्लफ्रेंडविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मी तुला बरबाद करेन, तुझ करीअर संपवून टाकेन अशी धमकी गर्लफ्रेंडने दिल्यााचा आरोप करिअप्पा याने लावला आहे. त्यामुळेच त्याने पोलिसांत धाव घेत तिच्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे.
एका चांगला फिरकीपटू असलेला केसी करिअप्पा हा आयपीएल 2023 मध्ये राजस्थान रॉयल्सचा भाग होता. पण आयपीएल 2024 च्या मिनी लिलावापूर्वी राजस्थान संघाने त्याला सोडले. 2024 मध्ये कोणत्याही संघाने केसी करिअप्पाला विकत घेतलेले नाही. आयपीएल लिलावात तो विकला गेला नाही. राजस्थानपूर्वी केसी करिअप्पा कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्जकडूनही खेळला होता.
एक्स – गर्लफ्रेंडने लावला आरोप
करिअप्पा नागासंद्राच्या रमैया लेआउटमध्ये राहतो. आपल्या एक्स -गर्लफ्रेंडला अंमली पदार्थांचे व्यसन असल्याचे त्याने बागलगुंठे पोलिसांना सांगितले. त्याने तिची ही सवय, व्यसन सोडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती काही सुधारली नाही. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, 31 डिसेंबर 2022 रोजी करिअप्पाच्या एक्स – गर्लफ्रेंडने बागलागुंटे पोलिसांकडे त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. करिअप्पमुळे मी गर्भवती होते आणि सप्टेंबरमध्ये मला जबरदस्ती गर्भपाताच्या गोळ्या खायला घालण्यात आल्याचा, आरोप तिने केला होता.
जीव देण्याचीही धमकी
तर करिअप्पाने त्याच्याच एक्स-गर्लफ्रेंडविरोधात तक्रार दाखल केली. मी तिला दारूचे व्यसन सोडवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तिने त्याचे काहीएक ऐकले नाही. अखेर मी तिला सोडण्याचा निर्णय घेतला, असे करिअप्पाने नमूद केले. मात्र यामुळे त्याची गर्लफ्रेंड भडकली आणि तू मला सोडलंस तर मी स्वत:चा जीव देईन आणि तूच मला असं (जीव देण्यास) करण्यास भाग पाडलं, अशी नोट लिहीन, अशी धमकी त्याच्या गर्लफ्रेंडने दिली. यामुळे तू बरबाद होशील, तुझं संपूर्ण करीअर संपुष्टात येईल, असेही तिने त्याला धमकावले.
करिअप्पाने नुकत्याच दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्याने आपल्या मैत्रिणीला दारू सोडण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न केला होता. जेव्हा तिने त्याचे ऐकले नाही तेव्हा करिअप्पाने त्याच्या मैत्रिणीला सोडण्याचा निर्णय घेतला. यामुळे संतापलेल्या त्याच्या मैत्रिणीने त्याला धमकी दिली की जर त्याने असे केले तर ती आत्महत्या करेल आणि त्याच्या नावावर सुसाईड नोट टाकेल आणि यामुळे करियप्पाची संपूर्ण क्रिकेट कारकीर्द संपुष्टात येईल.
2015 चे ऑक्शन होते विशेष
2015 चा लिलाव करिअप्पासाठी संस्मरणीय ठरला. 2015 च्या आयपीएल लिलावात करिअप्पाला कोलकाता नाईट रायडर्सने 2 कोटी 40 लाख रुपयांना विकत घेतले होते. करिअप्पा हा 10 लाख रुपयांच्या मूळ किंमतीसह ऑप्शनमध्ये उतरला होता. पण केकेआर संघाने त्याला 2 कोटी 40 लाख रुपयांना खरेदी केले.