ICC कडून नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ‘या’ 2 खेळाडूंवर 8 वर्षांची बंदी

| Updated on: Mar 17, 2021 | 7:47 AM

आयसीसीने (ICC) ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. आयसीसीने यूएईच्या मोहम्मद नाविद (Mohammad Naveed) आणि शाईमन बट (Shaiman Anwar Butt) यांच्यावर भ्रष्टाचार संहितेचे उल्लंघन केल्या प्रकरणी 8 वर्षांची बंदी घातली आहे.

ICC कडून नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी  या 2 खेळाडूंवर 8 वर्षांची बंदी
आयसीसी
Follow us on

दुबई : आयसीसीने (ICC) अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने यूएईच्या 2 खेळाडूंना निंलबित केलं आहे. आयसीसीने एकूण 8 वर्षांची बंदी घातली आहे. आयसीसीच्या नियमांच उल्लंघन केल्याप्रकरणी मोहम्मद नावेद (Mohammad Naveed) आणि शायमान अन्वर बट (Shaiman Anwar Butt) या खेळाडूंना निलंबित केलं गेलं आहे. या निलंबनाची अंमलबजावणी 16 ऑक्टोबर 2019 पासून झाली असल्याचे आयसीसीने सांगितलं आहे. टी 20 वर्ल्ड कप 2019 च्या स्पर्धेत या दोघांनी भ्रष्टाचार केल्याचं समोर आलं आहे. याबाबतची माहिती आयसीसीने ट्विटद्वारे दिली आहे. (icc banned to uae Mohammad Naveed and Shaiman Anwar Butt for 8 years under ICC Anti Corruption Code)

या प्रकरणाबाबत सुनावणी करण्यात आली. यादरम्यान या दोघांवर आयसीसीच्या 2.1.1 आणि 2.4.4 कलमांनुसार कारवाई करण्यात आली. सुनावणीनंतर आयसीसीच्या संबंधित समितीने या खेळाडूंना दोषी ठरवलं.

आयसीसीच्य एलेक्स मार्शल काय म्हणाले?

“नावेद आणि अनवर यूएईसाठी क्रिकेट खेळतात. नावेद टीमचा कर्णधार होता. तर अनवर सलामी फलंदाज होता. दोघेही खूप क्रिकेट खेळले आहेत. त्यामुळे त्यांना मॅच फिक्सिंगचा परिणाम काय होतो, हे त्यांना माहिती होतं. यानंतरही त्यांनी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी आपल्या संघ सहकारी आणि क्रिकेट चाहत्यांची फसवणूक केली”, असं आयसीसीचे इंटीग्रिटी यूनिटचे व्यवस्थापक अलेक्स मार्शल म्हणाले. तसेच “या दोघांवर केलेल्या कारवाईमुळे मी आनंदी आहे. या कारवाईमुळे पुढे असं प्रयत्न करणाऱ्यांना चाप बसेल”, असं मत मार्शल यांनी व्यक्त केलं.

दरम्यान काही दिवसांआधी श्रीलंकेचा माजी खेळाडू दिलहारा लोकुहेतिगेवर अशीच कारवाई करण्यात आली होती. आयसीसीने दिलहाराला टी-10 लीग स्पर्धेतील भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दोषी ठरवले होते.

संबंधित बातम्या :

India vs England 3Rd T20I | कॅप्टन कोहलीचा ‘विराट’ कारनामा, अर्धशतकी खेळीसह शानदार कामगिरी

India vs England 2021, 3rd T20 | जोस बटलरची शानदार खेळी, इंग्लंडची टीम इंडियावर 8 विकेट्सने मात, मालिकेत 2-1 ने आघाडी

(icc banned to uae Mohammad Naveed and Shaiman Anwar Butt for 8 years under ICC Anti Corruption Code)