लंडन : टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू आणि यष्टीरक्षक महेंद्र सिंह धोनीला सोशल मीडियावर सलाम ठोकला जातोय. पण दुसरीकडे आयसीसीच्या आदेशामुळे चाहते नाराजही झाले आहेत. धोनीच्या ग्लोजवर ‘बलिदान’ हा लोगो आहे. हा लोगो हटवण्याचे आदेश आयसीसीने दिले आहेत. धोनीच्या ग्लोजवर असलेला लोगो हटवण्यात यावा, असं आवाहन आयसीसीने बीसीसीआयला केलंय. हातावर स्पेशल पॅरा फोर्सचा लोगो लावून धोनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळत होता.
धोनीच्या हातावर असलेला लोगो तातडीने हटवण्यात यावा, असं आवाहन आयसीसीने बीसीसीआयला केलं आहे. आयसीसीचे महासंचालक आणि रणनीती समन्वयक क्लेयर फरलोंग यांनी याबाबतची माहिती दिली. धोनीच्या ग्लोजवर बलिदान ब्रिगेडचं चिन्ह आहे. फक्त पॅरा मिलिट्री कमांडोंनाच हे चिन्ह वापरण्याचा अधिकार आहे.
Para (Special Forces) commonly known as Para SF, is the special operations unit of the Indian Army.
Their regimental dagger insignia is on Dhoni’s gloves and spotted during @ICC world cup 2019. Wrong placement though. Ideally, this belongs on his back pocket. pic.twitter.com/x6jQMTUYUk
— Malik (@DissentingNote) June 6, 2019
धोनीला 2011 मध्ये पॅराशूट रेजिमेंटमध्ये लेफ्टिनंट कर्णल ही मानद उपाधी मिळाली आहे. शिवाय धोनीने त्याच्या रेजिमेंटसोबत विशेष ट्रेनिंगही घेतली होती. सैन्याविषयीचा आदर धोनीने वेळोवेळी बोलून दाखवलेला आहे. सैन्यात जाण्याची इच्छा त्याने अनेकदा बोलूनही दाखवलेली आहे. धोनीच्या ग्लोजचं सोशल मीडियावर कौतुक केलं जातंय. पण आयसीसीच्या नियमांमुळे भारतीय चाहते नाराज झाले आहेत.