मुंबई | टीम इंडिया-इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचं काउंटडाऊन सुरु झालंय. पाचवा आणि अखेरचा सामना हा 7 मार्चपासून धर्मशालेत होणार आहे. त्याआधी इंग्लंडने प्लेईंग ईलेव्हन जाहीर केलीय. तर त्यानंतर आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या कसोटी क्रमवारीत अनेक मोठे उलटफेर झाले आहेत. टीम इंडियापासून दूर असलेल्या विराट कोहली याला न खेळूनही फायदा झालाय. तर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज स्टीव्हन स्मिथ याला दुसंर स्थान गमवावं लागलं आहे. तर टीम इंडियाचे 2 फलंदाज हे टॉप 10 मध्ये पोहचलेत. तसेच टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने 2 स्थानांची झेप घेतली आहे.
न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज केन विलियमसन बॅटिंग रँकिगमधील अव्वल स्थान कायम राखण्यात यशस्वी ठरला आहे. केनच्या नावावर 870 रेटिंग्स आहेत. मात्र केनला रेटिंग्समध्ये तोटा झाला आहे. केनच्या नावावर गेल्या वेळेस 893 रेटिंग्स होते. मात्र त्यानंतरही केन आपलं पहिलं स्थान कायम राखण्यात यशस्वी ठरला आहे.
तर दुसऱ्या स्थानावर असलेला ऑस्ट्रेलियाचा स्टीव्हन स्मिथ याची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. स्टीव्हनला इंग्लंडचा जो रुट याने मागे टाकतं दुसरं स्थान पटकावलंय. स्टीव्हन स्मिथला रेटिंगमध्ये घट झाल्याने हा फटका बसलाय. स्टीव्हनची रेटिंगमध्ये 818 वरुन 789 अशी घसरण झाली आहे. न्यूझीलंडचा डॅरेल मिचेल 771 रेटिंगसह चौथ्या आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि फलंदाज बाबर आझम 768 रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर विराजमान आहे.
आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये नंबर 1 कोण?
Aussie duo hot on Jasprit Bumrah’s heels in the ICC Men’s Test Player Rankings for bowlers after their heroics in the first Test against New Zealand 💪 https://t.co/c6SRrIFAlk
— ICC (@ICC) March 6, 2024
तसेच आयसीसी टेस्ट बॅटिंग रँकिंगमध्ये 2 भारतीयांचा समावेश आहे. यामध्ये विराट कोहली आणि युवा यशस्वी जयस्वाल या दोघांचा समावेश आहे. तर कॅप्टन रोहित शर्मा यालाही फायदा झाला आहे. इंग्लंड विरुद्ध एकही सामना न खेळताही विराटला फायदा झालाय. विराटला नवव्या स्थानावरुन आठव्या क्रमांकावर झेप घेतलीय. यशस्वी जयस्वालची टॉप 10 मध्ये एन्ट्री झालीय. यशस्वी जयस्वाल 10 व्या क्रमांकावर पोहचला आहे. यशस्वीच्या नावावर 727 रेटिंग आहेत. तर रोहित शर्मा 13 व्या स्थानावरुन 11 व्या क्रमांकावर पोहचला आहे.