दुबई : आयसीसीने कसोटी क्रमवारी (Icc Test Ranking) जाहीर केली आहे. यामध्ये इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेत शानदार कामगिरी करणाऱ्या रवीचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि हिटमॅन रोहित शर्माला (Rohit Sharma) मोठा फायदा झाला आहे. या दोघांनी रॅंकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. तर कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) आपले स्थान कायम राखले आहे. तसेच जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि चेतेश्वर पुजाराची (Chetwshwar Pujara) घसरण झाली आहे. (ICC Test Rankings r ashwin 3rd position and rohit sharma enters top 10)
India opener Rohit Sharma storms into the top 10 to a career-best eighth position in the latest @MRFWorldwide ICC Test Player Rankings for batting ?
Full list: https://t.co/AIR0KN4yY5 pic.twitter.com/Hqb9uTWnzJ
— ICC (@ICC) February 28, 2021
अश्विवनला रॅंकिंगमध्ये मोठा फायदा झाला आहे. अश्विनने गोलंदाजांच्या रॅकिंगमध्ये 4 स्थानांसह तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. ताज्या आकडेवारीनुसार अश्विनचे एकूण 823 रँकिंग पॉइंट्स आहेत. अश्विनने इंग्लंड विरुद्धच्या 3 कसोटींमध्ये एकूण 24 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने पहिल्या सामन्यात 9, दुसऱ्या सामन्यात 8 आणि तिसऱ्या सामन्यात 7 विकेट्स मिळवल्या आहेत. तर जसप्रीत बुमराहला एका स्थानाचे नुकसान झाले आहे. बुमराहची नवव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.
रोहित शर्माने फलंदाजांच्या क्रमवारीत 6 स्थानांची मोठी उडी घेतली आहे. रोहितने टॉप 10 मध्ये धडक मारली आहे. त्याने थेट 14 व्या क्रमांकावरुन 8 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. रोहितचे एकूण 742 रेटिंग्स आहेत. रोहितने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात 161 धावांची खळी केली होती. तर तिसऱ्या सामन्यातही अर्धशतकी खेळी केली होती. तर कर्णधार विराट कोहलीला त्याचं पाचवं स्थान कायम राखण्यास यश आले आहे. तर तारणहार असलेला चेतेश्वर पुजाराची 2 स्थानाने घसरुन 10 व्या क्रमांकावर घसरण झाली आहे.
दरम्यान या मालिकेतील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना 4 ते 8 मार्चदरम्यान खेळवण्यात येणार आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा सामना जिंकून इंग्लंडचा एकतर्फी मालिका पराभव करण्याचा मानस टीम इंडियाचा असेल.
विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (व्हीसी), केएल राहुल, हार्दिक पंड्या, रिषभ पंत (विकेटकीपर), रिद्धीमान साहा (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल , वॉशिंग्टन सुंदर, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
संबंधित बातम्या :
(ICC Test Rankings r ashwin 3rd position and rohit sharma enters top 10)