दुबई : आयसीसीने ताजी कसोटी क्रमवारी (Icc Test Ranking) जाहीर केली आहे. या फलंदाजांच्या रॅकिंगमध्ये टॉप 10 मध्ये कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि टेस्ट स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) कायम आहेत. टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज रिषभ पंतने (Rishabh Pant) ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तर सलामीवीर हिटमॅन रोहित शर्माने (Rohit Sharma) या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. रोहितला इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत केलेल्या कामगिरीचा फायदा झाला आहे. (icc test rankings rishabh pant achieves career best position and Rohit Sharma breaks into top 15 batsmen )
? Rohit Sharma breaks into top 15 batsmen
? Rishabh Pant achieves career-best position
? Gains for Bangladesh, West Indies and England playersAll this and much more in the latest @MRFWorldwide ICC Test Player Rankings ?https://t.co/oTSOyRyVJt
— ICC (@ICC) February 17, 2021
फलंदाजांच्या क्रमवारीत विराटला आपलं 5 वं स्थान कायम राखण्यात यश आले आहे. तर पुजाराला एका स्थानचं नुकसान झालं आहे. पुजाराची 7 व्या क्रमांकावरुन 8 व्या क्रमांकावर घसरण झाली आहे.
रिषभ पंतने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आपल्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट स्थान प्राप्त केलं आहे. पंत या ताज्या आकडेवारीनुसार 11 व्या क्रमांकावर आहे. म्हणजेच पंत आता टॉप 10 कल्बच्या उंबरठ्यावर आहे. पंतला 2 स्थानांचा फायदा झाला आहे. पंतचे कसोटीतील रेटिंग्स पॉइंट्स हे 700 च्या पार गेले आहेत. पंतच्या नावे एकूण 715 रेटिंग्स पॉइंट्स आहेत. आयसीसीच्या फलंदाजांच्या क्रमवारीत पंत 700 पेक्षा अधिक रेटिंग्स मिळवणारा पहिला भारतीय विकेकीपर ठरला आहे.
रोहितने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत शानदार शतक लगावलं होतं. या शतकी खेळीचा रोहितला फायदा झाला आहे. रोहितने या रॅकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. रोहितला थेट 9 क्रमांकाचा फायदा झाला आहे. रोहितचा यासह पहिल्या 15 फलंदाजांमध्ये समावेश झाला आहे. याआधी रोहित टॉप 20 मध्येही नव्हता.
अष्टपैलू खेळाडू रवीचंद्रन अश्विनने ऑलराऊंड खेळाडूंच्या यादीत 5 व्या स्थानी झेप घेतली आहे. अश्विनलाही इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील ऑलराऊंड कामगिरीचा फायदा झाला आहे. अश्विनने इंग्लंड विरुद्ध शतक आणि एकूण 8 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती.
R Ashwin is the new No.5 all-rounder in the latest @MRFWorldwide ICC Test Player Rankings ?
Full list: https://t.co/OMjjVx5Mgf pic.twitter.com/HWEyIRqovo
— ICC (@ICC) February 17, 2021
दरम्यान इंग्लंड विरुद्ध तिसरा कसोटी सामना 24-28 दरम्यान अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. हा डे नाईट सामना असणार आहे. हा सामना गुलाबी चेंडूने खेळण्यात येणार आहे. या तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया आणि इंग्लंडची घोषणा करण्यात आली आहे.
विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (व्हीसी), केएल राहुल, हार्दिक पंड्या, रिषभ पंत (विकेटकीपर), रिद्धीमान साहा (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल , वॉशिंग्टन सुंदर, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड टीम :
जो रूट (कर्णधार), जेम्स एंडरसन, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टो, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक क्राउले, रोरी बर्न्स , बेन स्टोक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ओली पोप, डॉम सिबले, बेन फोक्स, ओली स्टोन, ख्रिस वोक्स आणि मार्क वुड.
संबंधित बातम्या :
(icc test rankings rishabh pant achieves career best position and Rohit Sharma breaks into top 15 batsmen )