ENG vs SA W, Semi Final 2 | दक्षिण आफ्रिकेकडून इंग्लंडला विजयासाठी 165 धावांचं आव्हान, फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोण भिडणार?

| Updated on: Feb 24, 2023 | 7:57 PM

दक्षिण आफ्रिकेच्या सलामीच्या लॉरा वोलवार्ड्ट आणि ताझमीन ब्रिट्स जोडीनं सार्थकी लावला. या जोडीनं पहिल्या गड्यासाठी 96 धावांची भागीदारी केली. लॉरा वोलवार्ड्टनं 44 चेंडूत 53 धावांची खेळी केली. यात 5 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे.

ENG vs SA W, Semi Final 2 | दक्षिण आफ्रिकेकडून इंग्लंडला विजयासाठी 165 धावांचं आव्हान, फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोण भिडणार?
Image Credit source: ICC
Follow us on

मुंबई : आयसीसी वुमन्स टी 20 वर्ल्डकपचा दुसरा उपांत्य फेरीचा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड सामना सुरु आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.दक्षिण आफ्रिकेनं 20 षटकात धावाचं 165 आव्हान इंग्लंडसमोर ठेवलं आहे. हा निर्णय सलामीच्या लॉरा वोलवार्ड्ट आणि ताझमीन ब्रिट्स जोडीनं सार्थकी लावला. या जोडीनं पहिल्या गड्यासाठी 96 धावांची भागीदारी केली. लॉरा सोफियाच्या गोलंदाजीवर बाद झाली. लॉरा वोलवार्ड्टनं 44 चेंडूत 53 धावांची खेळी केली. यात 5 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. त्यानंतर ताजमिन ब्रिट्सनंही आपलं अर्धशतक साजरं केलं. तिने 55 चेंडूत 68 धावांची खेळी करून बाद झाली. या खेळीत 6 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. त्यानंतर आलेली क्लोइ ट्रायननं झटपट बाद झाली. अवघ्या तीन धावा करून तंबूत परतली. त्यानंतर आलेली नादिन डी क्लर्क भोपळाही फोडू शकली नाही. दक्षिण आफ्रिकी फलंदाजांच्या सावध खेळीमुळे इंग्लंडचे गोलंदाज पुरते हतबळ दिसून आले.आजच्या सामन्यातील विजयी संघ अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. अंतिम फेरीचा सामना 26 फेब्रुवारी 2023 रोजी, भारतीय वेळेनुसारी संध्याकाळी 6.30 वाजता असणार आहे.

टी20 वर्ल्डकपमध्ये या संघांनी जेतेपदावर कोरलं नाव

  • 2009 इंग्लंड (इंग्लंड विरुद्ध न्यूझीलँड), इंग्लंडने हा सामना 6 गडी राखून जिंकला.
  • 2010 ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलँड) ऑस्ट्रेलियाने 3 धावांनी हा सामना जिंकला.
  • 2012 ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड) ऑस्ट्रेलियाने 4 धावांनी हा सामना जिंकला.
  • 2014 ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड) ऑस्ट्रेलियाने 6 गडी राखून हा सामना जिंकला.
  • 2016 वेस्ट इंडिज (ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज) वेस्ट इंडिजने 8 गडी राखून सामना जिंकला.
  • 2018 ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड) ऑस्ट्रेलियाने 8 गडी राखून हा सामना जिंकला.
  • 2020 ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत) ऑस्ट्रेलियाने 85 धावांनी हा सामना जिंकला.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

दक्षिण आफ्रिका : लॉरा वोलवार्ड्ट, ताझमीन ब्रिट्स, क्लोई ट्रायन, मॅरिझेन कप्प, सुने ल्यूस (कर्णधार), अन्नेके बॉश, नादिन डी क्लर्क, सिनालो जाफ्ता, शबनिम इस्माईल, अयाबोंगाा खाका, नोन्कुलुलेको म्लाबा

इंग्लंड : डॅनियले व्याट, सोफिया डंकले, एलिस कॅपसे, नॅट क्विवर ब्रंट, हिथर नाईट, एमी जोन्स, सोफि एक्सलस्टोन, कॅथरिन क्विवर ब्रंट, साराह ग्लेन, चार्ली डीन, लॉरेन बेल