ICC Womens T20 World Cup : टीम इंडियाची फायनलमध्ये धडक, विश्वविजयापासून एक पाऊल दूर

| Updated on: Mar 05, 2020 | 12:50 PM

आयसीसी महिला टी 20 विश्वचषकात भारतीय महिला संघांने अंतिम फेरीत धडक मारली आहे. (Indian team ICC Womens T20 World Cup final)

ICC Womens T20 World Cup : टीम इंडियाची फायनलमध्ये धडक, विश्वविजयापासून एक पाऊल दूर
Follow us on

सिडनी :  आयसीसी महिला टी 20 विश्वचषकात भारतीय महिला संघांने अंतिम फेरीत धडक मारली आहे. (Indian team ICC Womens T20 World Cup final) विश्वचषक नावावर करण्यासाठी भारताला आता केवळ एका विजयाची गरज आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाल्याने, आधीच्या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघ फायनल दाखल झाला. (Indian team ICC Womens T20 World Cup final)

भारतीय संघ अ गटात टॉपवर होता. त्याचाच फायदा आज भारतीय संघाला झाला. आता फायनलमध्ये भारताचा सामना 8 मार्चला होणार आहे. दुसऱ्या सेमीफायनलमधील विजेत्या संघ भारताशी भिडणार आहे.

ऑस्ट्रेलियातील सिडनीत सातत्याने पाऊस कोसळत आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात नाणेफेकही होऊ शकली नाही. आयसीसीच्या नियमानुसार सकाळी 11 वाजता टॉस होणार होता. मात्र पावसाचा वेग पाहता, भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामनाच रद्द करण्यात आला.

आयसीसीचा नियम

नियमानुसार, जर सेमीफायनलमध्ये पावसामुळे सामना रद्द झाला किंवा दोन्ही संघ किमान 10-10 षटकंही खेळू शकले नाहीत तर, संबंधित ग्रुपमधील संघाला फायनलचं तिकीट मिळेल. याच नियमाने भारतीय संघ फायनलमध्ये दाखल झाला.

टीम इंडिया 8 गुणांसह अ गटात तर दक्षिण आफ्रिका 7 गुणांसह ब गटात पहिल्या स्थानावर आहेत.

भारतीय संघाचा आतापर्यंतचा प्रवास

भारतीय महिला संघाने विश्वचषकात जबरदस्त कामगिरी केली आहे. भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांचा पराभव करत इथवर मजल मारली. भारताने विश्वचषकात एकही सामना गमावलेला नाही.