T20 Womens World Cup स्पर्धेत भारतानं तीन सामने जिंकल्यास थेट उपांत्य फेरीत, काय आहे गणित जाणून घ्या

| Updated on: Feb 14, 2023 | 3:03 PM

Women's T20 World Cup: भारतीय महिला संघाने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला तारे दाखवले. या विजयानंतर भारताची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. आता भारताने तीन सामने जिंकल्यास थेट उपांत्य फेरीत वर्णी लागणार आहे.

T20 Womens World Cup स्पर्धेत भारतानं तीन सामने जिंकल्यास थेट उपांत्य फेरीत, काय आहे गणित जाणून घ्या
महिला T20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताचं उपांत्य फेरीचं गणित असं असेल, जाणून घ्या
Image Credit source: ICC
Follow us on

मुंबई : वूमन्स आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेत भारतानं दमदार सुरुवात केली. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला 7 गडी आणि एक षटक राखून पराभूत केला. या विजयामुळे भारतीय महिला संघाचा टी 20 वर्ल्डकप स्पर्धेतील आत्मविश्वास दुणावला आहे. तर उपांत्य फेरीसाठीचा मार्ग सहज सोपा होत चालला आहे. भारत असलेल्या गटात इंग्लंड, पाकिस्तान, आयर्लंड आणि वेस्ट इंडिज संघ आहेत. प्रत्येक संघाल एकूण चार सामने खेळायचे आहेत. चारही सामन्यात विजय मिळवला तर थेट उपांत्य फेरीत वर्णी लागणार आहे. भारतानं या स्पर्धेतील पहिला सामना जिंकला असून तीन सामने उरले आहेत. यासाठी भारताला इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि आयर्लंडशी भिडावं लागणार आहे. या गटात तसा इंग्लंडचा संघ तगडा आहे. त्यामुळे भारताच्या या सामन्यात कस लागेल. तर वेस्ट इंडिज आणि आयर्लंड संघ कधीही गणित बिघडवू शकतात. उपांत्य फेरीसाठी 8 गुणांची आवश्यकता आहे. भारताचे आता दोन गुण झाले असून इंग्लंड 4 गुणांसह अव्वल स्थानी आहे. उपांत्य फेरीचा सामना 23 आणि 24 फेब्रुवारीला असणार आहे. तर अंतिम सामना 26 फेब्रुवारी 2023 रोजी रंगणार आहे.

भारतीय संघाचे सर्व सामने आणि तारखा

  • भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (15 फेब्रुवारी 2023, वेळ- संध्याकाळी 6.30 वाजता)
  • भारत विरुद्ध इंग्लंड (18 फेब्रुवारी 2023, वेळ- संध्याकाळी 6.30 वाजता)
  • भारत विरुद्ध आयर्लंड (20 फेब्रुवारी 2023, वेळ- संध्याकाळी 6.30 वाजता)

भारतीय संघ- हार्लीन देओल, जेमिह रॉड्रिग्स, सब्बिनेनी मेघना, शफाली वर्मा, स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, हरमनप्रीत कौर (कर्णधार), पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, रिचा घोष, यास्तिका भाटिया, अंजली सरवानी, मेघना सिंग, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग, शिखा पांडे

इंग्लंड संघ- अलिस कॅप्से, डॅनी वॅट, मैया बाउचिर, सोफिया डुंकले, चार्ली डीन, डॅनियल गिब्सन, हीथर नाईट (कर्णधार), नॅट क्विअर, अमी जोन्स, लॉरेन विनफिल्ड हिल, फ्रेया डेविस, इस्सी वोंग, केट क्रॉस, कॅथरिन ब्रंट, लॉरेन बेल, सारा ग्लेन, सॉफि एक्सेलस्टोन

आयर्लंड संघ- अमी हंटर, गॅबी लेव्हीस, लॉसी लिटल, रिबेक्का स्टोकेल, शाउना कवनाघ, अरलेना केली, इमीर रिचर्डसन, लॉरा डेलनी (कर्णधार), लीह पॉल, ओरला प्रेंडरगस्ट, सोफी मॅकमोहन, मॅरी वॉलड्रन, कारा मुरे, जॉर्जिना डेमसे

वेस्ट इंडिज संघ- चेडियन नेशन, जेनबा जोसेफ, झैदा जेम्स, आलिया एलेयन, चिनले हेन्री, हेले मॅथ्यू, स्टॅफनी टेलर, ट्रिशन होल्डर, रशदा विलियम्स, शेमैने कॅम्पबेल, अफी फ्लेचर, करिश्मा रामहराक, शबिका गजनबी, शकेरा सेलमन, शॅमिलिया कॉनवेल