एकाकी झुंजला, वाघासारखं लढला, न्यूझीलंडमध्ये जन्मलेला बेन स्टोक्सने इंग्लंडला जिंकवलं!

| Updated on: Jul 15, 2019 | 11:12 AM

इंग्लंडला जगज्जेता पद मिळवून देण्यात बेन स्टोक्सचा सिंहाचा वाटा होता. बेन स्टोक्सने त्याच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर 98 चेंडूत नाबाद 84 धावा केल्या.

एकाकी झुंजला, वाघासारखं लढला, न्यूझीलंडमध्ये जन्मलेला बेन स्टोक्सने इंग्लंडला जिंकवलं!
Follow us on

लंडन : विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात थरारक सामन्यांपैकी एक सामना काल इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर पाहायला मिळाला. अंतिम सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडला पराभूत करत विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडने इंग्लंडसमोर 241 धावांचं आव्हान ठेवलं. इंग्लंडला जिंकण्यासाठी शेवटच्या एका चेंडूत दोन धावांची गरज होती. पण, दोन धावा काढण्याच्या प्रयत्नात फलंदाज मार्क वूड धावबाद झाला. त्यामुळे सामना टाय झाला. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये हा सामना खेळवण्यात आला. सुपर ओव्हरमध्येही सामना टाय झाला. तेव्हा सर्वाधिक चौकार मारणारा विजयी या निकषावर निर्णय घेण्यात आला. आयसीसीच्या याच नियमामुळे इंग्लंडला विश्वविजेता होण्याचा मान मिळाला.

इंग्लंडला जगज्जेता पद मिळवून देण्यात बेन स्टोक्सचा सिंहाचा वाटा होता. बेन स्टोक्सने त्याच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर 98 चेंडूत नाबाद 84 धावा केल्या. यामध्ये पाच चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. सुपर ओव्हरमध्येही जोस बटलरसोबत बेन स्टोक्सला फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं. संघाचा हा निर्णय त्याने योग्य ठरवला. सुपर ओव्हरमध्येही बेन स्टोक्सने 1 चौकारसह तीन चेंडूत 8 धावा करत न्यूझीलंडला 16 धावांचं आव्हान दिलं. यामध्ये न्यूझींलंडने 15 धावा केल्या आणि सामना पुन्हा टाय झाला. त्यानंतर सर्वाधिक चौकार मारणारा विजयी या निकषावर निर्णय घेण्यात आला आणि इंग्लंड जिंकला.

हेही वाचा : ENG vs NZ: बोल्टच्या ‘या’ पावलानं न्यूझीलंडचं विश्वचषकाचं स्वप्न भंगलं

न्यूझीलंडला धूळ चारणाऱ्या बेन स्टोक्सचा जन्म हा न्यूझीलंडचाच

इंग्लंडला विश्वविजेता होण्यासाठी बेन स्टोक्सच्या अभूतपूर्व खेळीची मदत मिळाली. पण, ज्याने न्यूझीलंडला धूळ चारली त्या बेन स्टोक्सचा जन्म हा न्यूझीलंडमधलाच आहे. न्यूजीलंडची राजधानी क्रायस्टचर्चमध्ये 4 जून 1991 मध्ये बेन स्टोक्सचा जन्म झाला. मात्र, स्टोक्स 12 वर्षांचा असताना तो इंग्लंडंध्ये स्थायिक झाला. इंग्लंडमध्येच त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली.

डावखुरा फलंदाज बेन स्टोक्सने रविवारी लॉर्ड्सच्या मैदानावर उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं. बेन स्टोक्स पाचव्या क्रमांकावर मैदानात उतरला. त्यावेळी इंग्लंडने तीन विकेट गमावलेल्या होत्या. त्यानंतर स्टोक्सने जबाबदारी सांभाळली आणि सामन्याच्या शेवटपर्यंत मैदानावर टिकून राहिला. तसेच, त्याने केलेल्या 84 धावांच्या जोरावर इंग्लंड न्यूझीलंडशी बरोबरी करु शकला आणि अखेर इंग्लंड विश्वविजेता बनला.

VIDEO :