ICC World Cup : भारताचा विजय महत्त्वाचाच, पण धोनीचं शतक त्यापेक्षाही महत्त्वाचं!

| Updated on: May 29, 2019 | 9:31 AM

ICC World Cup 2019 कार्डिफ, इंग्लंड : विश्वचषकाच्या दुसऱ्या सराव सामन्यात भारताने बांगलादेशचा 95 धावांनी पराभव केला. के एल राहुल आणि महेंद्रसिंह धोनी यांच्या खणखणीत शतकांच्या जोरावर भारताने हा सोपा विजय मिळवला. भारताचा हा विजय जेवढा महत्त्वाचा आहे, त्यापेक्षा जास्त धोनी फॉर्ममध्ये परतणे हे महत्त्वाचं आहे, असं जाणकार सांगतात. या सामन्यात राहुलने 99 चेंडूत 108 तर […]

ICC World Cup : भारताचा विजय महत्त्वाचाच, पण धोनीचं शतक त्यापेक्षाही महत्त्वाचं!
Follow us on

ICC World Cup 2019 कार्डिफ, इंग्लंड : विश्वचषकाच्या दुसऱ्या सराव सामन्यात भारताने बांगलादेशचा 95 धावांनी पराभव केला. के एल राहुल आणि महेंद्रसिंह धोनी यांच्या खणखणीत शतकांच्या जोरावर भारताने हा सोपा विजय मिळवला. भारताचा हा विजय जेवढा महत्त्वाचा आहे, त्यापेक्षा जास्त धोनी फॉर्ममध्ये परतणे हे महत्त्वाचं आहे, असं जाणकार सांगतात. या सामन्यात राहुलने 99 चेंडूत 108 तर धोनीने केवळ 78 चेंडूत घणाघाती 113 धावा ठोकल्या. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने बांगलादेशसमोर विजयासाठी 50 षटकात 360 धावांचं आव्हान उभं केलं होतं. हे आव्हान बांगलादेशला पेलवलं नाही. बांगलादेशचा डाव 49.3 षटकात 264 धावांत आटोपला.

या सामन्यात बांगलादेशने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं. शिखर धवन (1) आणि रोहित शर्मा (19) ही सलामी जोडी स्वस्तात माघारी परतल्यानंतर विराट कोहलीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. विराट कोहली 46 चेंडूत 47 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर के एल राहुल आणि धोनीने आधी संयमी खेळी करत भारताचा डाव सावरला आणि मजबूत भागीदारी केली. दोघांनीही वैयक्तीक शतकं झळकावली. राहुलने 99 चेंडूत 108 धावा ठोकल्या. यामध्येत याने 12 चौकार आणि 4 षटकार ठोकले. तर धोनीने 2011 मधील वर्ल्डकपच्या खेळीची नमुना दाखवत केवळ 78 चेंडूत घणाघाती 113 धावा ठोकल्या. या खेळीत धोनीने 8 चौकार आणि 7 उत्तुंग षटकार मारले. यानंतर हार्दिक पंड्या 11 चेंडूत 21 धावा करुन बाद झाला. जाडेजाने 4 चेंडूत 11 तर कार्तिक 5 चेंडूत 7 धावा करुन नाबाद राहिले. त्यामुळे भारताला 50 षटकात 7 बादत 359 अशी मजल मारता आली.

WORLD CUP 2019 : वर्ल्डकपमध्ये सात नवे नियम पहिल्यांदाच लागू होणार

यानंतर भारतीय गोलंदाजांनीही टिच्चून गोलंदाजी केली. भारताची फिरकी जोडी यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या दोघांनी बांगलादेशी फलंदाजांना नाचवलं. दोघांनीही प्रत्येकी तीन-तीन विकेट घेतल्या. बुमराहने 2 आणि जाडेजाने 1 विकेट घेत त्या दोघांना चांगली साथ दिली.

बांगलादेशकडून सलामीवीर लितॉन दास 73, अनुभवी फलंदाज मुशफिकुर रहीमने 90 धावा करुन बांगलादेशच्या आशा पल्लवित ठेवल्या. मात्र इतर खेळाडूंची साथ न लाभल्यामुळे त्यांना विजयापर्यंत पोहोचता आलं नाही. बांगलादेशचा डाव 49.3 षटकात 264 धावांत आटोपला.

धोनीचा फॉर्म

आयपीएलमध्ये धोनीचा फॉर्म सर्वांनीच पाहिला होता. पण आता वन डेमध्येही धोनीचा हा फॉर्म दिसल्याने विश्वचषकापूर्वी भारतासाठी ही मोठी दिलासादायक गोष्ट आहे. गेल्या सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. त्या सामन्यात फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले होते. पण या सामन्यात चुका दुरुस्त करत मोठी धावसंख्या उभी केली.

भारताचा विजय जसा महत्वाचा आहे, तसा धोनीचं शतक अत्यंत महत्त्वाचं आहे. धोनी फॉर्ममध्ये परतल्याने भारताची मधळी फळी अत्यंत भक्कम होईल. त्याचा फायदा भारताला विश्वचषकात नक्कीच होईल.

संबंधित बातम्या 

माही मार रहा है! बांगलादेशविरुद्ध षटकार ठोकून धोनीचं शतक पूर्ण 

WORLD CUP 2019 : वर्ल्डकपमध्ये सात नवे नियम पहिल्यांदाच लागू होणार  

फोर्ब्स इंडिया मॅगजीनच्या कव्हर पेजवर रोहित शर्माचा फोटो   

खेळाडूला दुखापत झाली, इंग्लंडचे प्रशिक्षकच क्षेत्ररक्षणासाठी उतरले