अहमदाबाद : टीम इंडियाने चौथ्या कसोटीत इंग्लंडवर (India vs England 4th test) डाव आणि 25 धावांनी विजय मिळवला. भारताने या विजयासह 3-1 च्या फरकाने मालिका खिशात घातली. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत (World Test Championship) धडक मारली. त्यामुळे आता भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. या अंतिम सामन्यात टीम इंडिया न्यूझीलंडसोबत भिडणार आहे. हा अंतिम सामना क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर (Lords) खेळवण्यात येऊ शकतो. पण याबाबत अजूनही निश्चितता नाही. हा अंतिम सामना लॉर्ड्स तसेच साउथम्प्टन या दोन्ही पैकी कोणत्याही मैदानात खेळवण्यात येऊ शकतो. (ICC world test championship final match venue are not confirm)
टाइम्स ऑफ इंडियानुसार , ICC ने अजूनही या अंतिम सामन्याबाबतचं ठिकाण निश्चित नाही. तर क्रिकबझनुसार हा सामना लॉर्ड्सऐवजी साउथम्प्टन मध्ये आयोजित केला जाऊ शकतो.
हा अंतिम सामना 18 ते 22 जून दरम्यान पार पडणार आहे. या सामन्याच्या आयोजनसाठी सर्वांचीच लॉर्ड्सला पंसती होती. तसेच मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड आणि बर्मिंघममधील एजबस्टेन स्टेडियम या सामन्याच्या यजमानपदाच्या स्पर्धेत होते. पण या दोन्ही स्टेडियमच्या तुलने साउथम्प्टनमध्ये सर्व अत्याधुनिक सेवा सुविधा आहेत. यामुळे साउथम्प्टनचे नाव आघाडीवर आहे.
साउथम्प्टन स्टेडियमला लागून पंचतारांकित हॉटेल आहे. त्यामुळे या हॉटेलमध्ये खेळाडूंची बायोबबलच्या सुरक्षित राहण्याची सोय होईल. यामुळे त्यांचा अनावश्यक प्रवासाचा वेळही वाचेल. काही महिन्यांपूर्वी इंग्लंडने साउथम्प्टनमध्ये वेस्टइंडिज विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्यांचे यशस्वीरित्या आयोजन केलं होतं. साउथम्प्टनच्या एका अधिकाऱ्यांना या अंतिम सामन्याच्या आयोजनाबाबत प्रतिक्रिया दिली. “वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्याच्या आयोजनाबाबतीत मी फार काही बोलू शकत नाही. मात्र याबाबत चर्चा सुरु आहे.”
आयसीसीकडून अंतिम सामन्याच्या ठिकाणाचा तिढा लवकरच सोडवण्यात येणार आहे. आयसीसी हा अंतिम सामना कुठे खेळवण्यात येईल, याबाबत लवकरच घोषणा करणार आहे. त्यामुळे हा सामना क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्सवर रंगणार की आणखी कुठे, हे पाहणं औत्सुतक्याचं ठरणार आहे.
(ICC world test championship final match venue are not confirm)