सिक्स मारुन दाखव, विकेटमागून टीम पेनचं रोहित शर्माला चॅलेंज

| Updated on: Jul 05, 2019 | 4:47 PM

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत पाहुण्या संघासोबत होणारी स्लेजिंग चांगलीच चर्चेत आहे. पर्थ कसोटीत भारतीय कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनच्या निशाण्यावर होता. यावेळी रोहित शर्माचा नंबर आहे. रोहित शर्माने मेलबर्नच्या ग्राऊंडवर षटकार ठोकला तर मी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळेन, असं बोलताना पेन त्याचा सहकारी अॅरॉन फिंचसोबत कॅमेऱ्यात कैद झाला. पेन हा ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक […]

सिक्स मारुन दाखव, विकेटमागून टीम पेनचं रोहित शर्माला चॅलेंज
Follow us on

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत पाहुण्या संघासोबत होणारी स्लेजिंग चांगलीच चर्चेत आहे. पर्थ कसोटीत भारतीय कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनच्या निशाण्यावर होता. यावेळी रोहित शर्माचा नंबर आहे. रोहित शर्माने मेलबर्नच्या ग्राऊंडवर षटकार ठोकला तर मी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळेन, असं बोलताना पेन त्याचा सहकारी अॅरॉन फिंचसोबत कॅमेऱ्यात कैद झाला.

पेन हा ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक आहे. त्याच्या बाजूलाच उभा असलेल्या फिंचसोबत तो बोलत होता. ‘मला रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यापैकी एक संघ निवडायचा आहे. रोहितने इथे षटकार मारला तर मी मुंबई इंडियन्सकडून खेळेन’, असं पेन म्हणाला. पेन स्टम्पच्या मागे उभा राहून सतत रोहितचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत होता. रोहितने प्रत्येक वेळी त्याला हसून उत्तर दिलं. वाचा“मुरली, मला माहितीये एक माणूस म्हणून विराट तुला आवडत नाही”

 

भारताच्या पहिल्या डावात रोहित शर्माने नाबाद 63 धावांची खेळी केली. यामध्ये एकाही षटकाराचा समावेश नव्हता. रोहितने 50 पेक्षा अधिक धावा केल्यानंतर त्याला षटकार मारण्यापासून रोखणं मोठं आव्हान असतं. पहिल्या कसोटीत तर त्याने 37 धावांमध्येच तीन षटकार ठोकले होते. वाचाइशांत शर्मा आणि रवींद्र जाडेजा मैदानातच भिडले!

राजस्थान रॉयल्समधील जॉस बटलर आणि बेन स्टोक्स यांच्याविषयी देखील पेनने वक्तव्य केलं. “रॉयल्समध्ये इंग्लंडचे जरा जास्तच खेळाडू आहेत”, असं तो म्हणाला. “तू जवळपास सगळ्याच टीमकडून खेळला आहेस ना?”, असं पेन फिंचला म्हणाला. फिंचने उत्तर दिलं, “बंगळुरु सोडून”.