मुंबई : इंडियन प्रीमियर लीग 2023 चं 16 वं पर्व 31 मार्चपासून सुरु होणार आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींचं चांगलंच मनोरंजन होणार आहे. यंदाच्या स्पर्धेत काही नियम लागू करण्यात आले आहेत. यात इम्पॅक्ट प्लेयर नियम असणार आहे. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच असा नियम लागू होणार आहे. यात इम्पॅक्ट प्लेयरला गोलंदाजी आणि फलंदाजी करता येणार आहे. फुटबॉल आणि बास्केटबॉलसारख्या खेळात हा नियम आहे. सामन्याच्या स्थितीनुसार सब्सिस्ट्युट खेळाडूला खेळवता येणार आहे. या नियमाची घोषणा 23 डिसेंबर 2022 रोजी करण्यात आली होती.
आयपीएलमध्ये एकूण दहा संघ असणार आहेत. संघ मैदानात 11 खेळाडू घेऊन उतरेल. त्याचबरोबर 4 सब्स्टिट्युट खेळाडूंची नावं नाणेफेकीवेळी सांगावी लागतील. इम्पॅक्ट प्लेयर या चार जणांमधून एक इम्पॅक्ट प्लेयर निवडावा लागणार आहे.
इम्पॅक्ट प्लेयर भारतीय असेल की विदेशी हे प्लेईंग 11 वर अवलंबून असेल. उदाहरण द्यायचं झालं तर चेन्नई आणि गुजरात संघाची सामना असेल. चेन्नईने प्लेईंग 11 मध्ये चार विदेशी खेळाडू घेतले, तर त्यांना इम्पॅक्ट प्लेयर म्हणून भारतीय खेळाडू घ्यावा लागेल. दुसरीकडे, गुजरातने प्लेईंग 11 मध्ये तीन विदेशी खेळाडू घेतले, तर त्यांना इम्पॅक्ट प्लेयर म्हणून विदेशी खेळाडूला वापरता येईल. असं असलं तरी नाणेफेकीच्या वेळी सुचवलेली चार खेळाडूंपैकीच एकाची इम्पॅक्ट प्लेयर म्हणून निवड करता येईल.
संघ इम्पॅक्ट प्लेयरचा वापर सामन्याच्या सुरुवातीपासून करू शकतो. संघाला वाटल्यास शेवटच्या काही ओव्हरसाठी त्याचा वापर करू शकते. विकेट पडल्यानंतर किंवा बॅटर रिटारर्ड हर्ट झाला की खेळाडू मैदानात उतरू शकतो.
पण विकेट पडल्यानंतर किंवा फलंदाज रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर गोलंदाजी असणाऱ्या संघाने इम्पॅक्ट प्लेयर आणाला तर तो आधीचं षटक पूर्ण करू शकणार नाही. त्याला पुढच्या षटकापर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.
नाही. प्लेईंग इलेव्हनमध्ये एखाद्या खेळाडूची जागा इम्पॅक्ट प्लेयरने घेतली तर मूळ खेळाडू मैदानात उतरू शकत नाही. म्हणजेच बॅटिंग, बॉलिंग सोडा फिल्डिंगही करू शकत नाही.
इम्पॅक्ट प्लेयर बॅटिंगला एखादा खेळाडू आऊट झाला किंवा रिटायर्ड हर्ट झाला तरच येऊ शकतो. कोणत्याही परिस्थितीत फक्त 11 जणांना खेळण्याची परवानगी असणार आहे.
इम्पॅक्ट प्लेयर आपली चारही षटकं पूर्ण टाकू शकतो. पण कोणत्याही षटकाची मध्यात सुरुवात करू शकत नाही. म्हणजेच एखादा गोलंदाज तीन चेंडू टाकून जखमी होत बाहेर गेला तर ते षटक मैदानातील खेळाडू पूर्ण करेल. इम्पॅक्ट प्लेयरला ते षटक संपल्यानंतर गोलंदाजी करण्याची मुभा असेल.