केंद्राने एकाच डावात पेच सोडवला! कुस्ती महासंघाचे नवीन अध्यक्ष संजय सिंह यांचे गेले पद

| Updated on: Dec 24, 2023 | 11:54 AM

WFI Sanjay Singh | 'देर आये दुरुस्त आये' या म्हणीचा प्रत्यय क्रीडा विश्वाला आला आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतीय कुस्ती महासंघ वादाचा आखाडा झाला आहे. त्यामुळे परदेशात पण देशाची प्रतिमा डागळली आहे. महिला आणि पुरुष कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाविरोधात आंदोलन केले. यामध्ये केंद्र सरकार पेचातच अडकले होते. त्यावर केंद्रानेच एक धक्का और दो चा नारा दिला आहे.

केंद्राने एकाच डावात पेच सोडवला! कुस्ती महासंघाचे नवीन अध्यक्ष संजय सिंह यांचे गेले पद
Follow us on

नवी दिल्ली | 24 डिसेंबर 2023 : भारतीय कुस्ती महासंघाच्या आखाड्यात अजून ही डावपेच सुरुच आहे. वादाच्या आखाड्यात आता केंद्राने डाव टाकला आहे. यामध्ये नवनिर्वाचीत अध्यक्ष संजय सिंह चीतपट झाले आहेत. महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आंदोलनाला काही प्रमाणात न्याय मिळाला तर वावगं ठरु नये. कुस्तीच्या आखाड्यात लैगिंक शोषणाच्या आरोपांनी काहूर माजवले होते. देश पातळीवरच नाही तर परदेशातही क्रीडा क्षेत्राला काळिमा फासल्या गेली होती. यावर केंद्राच्या संथ भूमिकेने क्रीडा पटू नाराज होते. याप्रकरणात ठपका ठेवलेले भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांचे अगदी जवळचे संजय सिंह हे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निवडून आले होते. त्यानंतर महिला कुस्तीपटू साक्षी मलिक यांनी संन्यास घेण्याची घोषणा केली. आता केंद्र सरकारने कुस्ती महासंघचं बरखास्त केला आहे.

राष्ट्रीय स्पर्धेपूर्वीच दणका

भारतीय कुस्ती महासंघाने कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा आयोजीत केली आहे. ही टूर्नामेंट 28 डिसेंबर रोजी उत्तर प्रदेशातील गोंडा येथे होणार आहे. यामुळे भारतीय महिला कुस्तीपटू साक्षी मलिक नाराज होती. त्यांनी कुस्ती सोडण्याचा निर्णय जाहीर केला. रात्रीपासून झोप लागली नाही. कनिष्ठ महिला कुस्तीपटू भांबावलेल्या आहेत. त्यांचे सारखे फोन सुरु आहेत. या स्पर्धा गोंडा येथील नंदनी नगरमध्ये होणार असल्याचे या महिला कुस्तीपटूंनी सांगितल्यापासून व्यथित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

हे सुद्धा वाचा

अशा केल्या भावना व्यक्त

” गोंडा हा बृजभूषण यांचा भाग आहे. आता तुम्हीच विचार करा की, कनिष्ठ महिला कुस्तीपटू कोणत्या परिस्थितीत तिथे मैदानात उतरतील. काय देशभरात केवळ गोंडातील नंदनी नगर येथील एकच जागा या स्पर्धा भरवण्यासाठी उरली होती का? काय करु काहीच समजत नाही.” अशा भावना साक्षी मलिक यांनी व्यक्त केली.

साक्षी मलिक-विनेश फोगटचा कुस्तीला रामराम

भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचे विश्वासू संजय सिंह निवडून आले. त्यांच्या पॅनलला 40 मतं मिळाली. तर प्रतिस्पर्धी राष्ट्रीय खेळातील पदक विजेती अनिता श्योराण यांना केवळ 7 मते पडली होती. संजय सिंह यांची अध्यक्षपदी वर्णी लागल्याने साक्षी मलिक आणि विनेश फोगाट यांनी कुस्तीला रामराम ठोकला. साक्षी मलिकसह इतर महिला कुस्तीपटू यांनी बृजभूषण यांच्यावर महिला कुस्तीपटूंच्या लैगिंक छळाचा आरोप केला होता. त्यांनी दिल्लीत मोठे आंदोलन पण उभारले होते. पण एकूणच केंद्र सरकारच्या भूमिकेने कुस्तीपटू आणि इतर खेळाडू नाराज होते. पण आता केंद्राने एक डाव धोबीपछाड असे केल्याने पुढे काय घडते याकडे क्रीडा विश्वाचे लक्ष लागले आहे.