Ind vs Aus Video : स्टीव्ह स्मिथला आश्विनचा पेपर काही सुटेना, आला अन् हजेरी लावून गेला

| Updated on: Feb 17, 2023 | 6:05 PM

Ind vs Aus second test : दुसऱ्या कसोटी सामन्यातही ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथला आश्विनंचं कोडं सोडवता आलं नाही.

Ind vs Aus Video : स्टीव्ह स्मिथला आश्विनचा पेपर काही सुटेना, आला अन् हजेरी लावून गेला
Follow us on

Ind vs Aus : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्याच दिवशी भारतीय गोलंदाजांनी कांगारूंचा गुंडाळलं आहे. पहिल्या डावामध्ये ऑस्ट्रेलियाला भारतीय गोलंदाजांनी 263 धावात ऑल आऊट केलं. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने चांगली सुरूवात केली होती. मात्र आश्विनने घेतलेल्या 2 विकेट्सने कांगारू बॅकफूटवर गेले. दुसऱ्या कसोटी सामन्यातही ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथला आश्विनंचं कोडं सोडवता आलं नाही.

ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि डेव्हिड वॉर्नर यांनी संघाला सावध सुरूवात करून दिली. सुरूवातीच्या ओव्हर्समध्ये भारतीय संघाला विकेट घेण्यात यश आलं नाही. कांगारूंनी एकही गडी न गमावता 50 धावा केल्या होत्या, मोहम्मद शमीने वॉर्नरला बाद करत पहिला धक्का दिला. त्यानंतर आलेल्या मार्नस लाबुशेनसोबत उस्मान ख्वाजाने भागीदारी रचायला सुरूवात केली होती.

 

सामन्याच्या 23 व्या ओव्हरमध्ये आश्विनने लाबुशेनला पायचीत पकडत यश मिळवून दिलं. लाबुशेन बाद झाल्यावर स्मिथ खेळायला आला. स्मिथला आश्विनने फक्त हजेरी लावून दिली. दुसऱ्याच बॉलवर स्मिथला आश्विनने बाद केलं. आश्विनच्या बॉलला डिफेंन्स करताना कीपर श्रीकर भरतकडे झेल गेला आणि कांगारूंना सलग दुसरा धक्का बसला. मागील सामन्यामध्ये स्टीव्ह स्मिथला जडेजाने बाद केलं होतं. दुसऱ्या डावात तो नाबाद राहिला होता. आत्मविश्वास वाढलेल्या स्मिथला आजच्या सामन्यात साधा भोपळाही फोडता आला नाही.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या दोन विकेट्स पडल्यानंतर उतरती कळा लागल्याचं दिसून आलं. काही अंतरावर फलंदाज बाद होत गेले, कांगारूंडून फक्त उस्मान ख्वाजा 81 आणि पीटर हँड्सकॉम्ब नाबाद 72 धावा केल्या.

टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, आर. अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज,

टीम ऑस्ट्रेलिया – पॅट कमिन्स (कॅप्टन), डेविड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, ट्रेविस हेड, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि मॅथ्यू कुहनेमन.