Ind vs Aus: ‘या’ दोन खेळाडूंमुळे कर्णधार विराट कोहलीच्या अडचणीत वाढ

| Updated on: Dec 16, 2020 | 1:58 PM

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 17 डिसेंबरपासून 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे.

Ind vs Aus: या दोन खेळाडूंमुळे कर्णधार विराट कोहलीच्या अडचणीत वाढ
Follow us on

अॅडिलेड : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात (India Tour Australia 2020) उद्यापासून (17 ऑक्टोबर) कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे. एकूण 4 कसोटी सामन्यांची ही मालिका असणार आहे. हा पहिला कसोटी सामना अॅडिलेडवर खेळला जाणार आहे. हा सामना पिंक (गुलाबी) चेंडूनी खेळण्यात येणार असून डे-नाईट असणार आहे. ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा पराभव केला. तर टीम इंडियाने या पराभवाचा वचपा टी 20 मालिकेत घेतला. त्यामुळे दोन्ही संघांसाठी कसोटी मालिका प्रतिष्ठेची झाली आहे. मात्र या पहिल्या कसोटीआधी कर्णधार विराटच्या अडचणीत वाढ झाली आहे. ind vs aus before 1st test these 2 players of team india increased virat kohli troubles

नक्की काय झालंय?

टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मा. रोहितला दुखापतीमुळे पहिल्या 2 कसोटी सामन्यांना मुकावे लागले आहे. रोहित टीम इंडियासाठी सलामी करतो. मात्र तो पहिल्या 2 कसोटीसाठी उपलब्ध नाही. त्यामुळे रोहितच्या अनुपस्थितीत सलामीची मदार मयंक अग्रवालच्या (Mayank Agarwal) खांद्यावर आहे. मात्र मयंकच्या सोबतीला कोण येणार हे अजूनही निश्चित नाही. मात्र मयंकच्या जोडीला पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आला तर नक्कीच टीम इंडियासाठी हा नक्कीच चिंतेचा विषय ठरु शकतो.

पृथ्वी आणि मयंक आव्हानासाठी तयार?

कसोटी मालिकेसाठी टीम इंडियासमोर आव्हान असणार आहे. विराट पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतणार आहे. तर रोहित दुखापतीमुळे पहिल्या 2 कसोटी खेळणार नाही. त्यातच टीम इंडियासमोर ओपनिंगचा (सलामी) प्रश्न आवासून उभा आहे. मयंकला ऑस्ट्रेलियाविरोधातील एकदिवसीय सामन्यात संधी देण्यात आली. मात्र त्याला 2 सामन्यात 50 धावाच करता आल्या. मयंकला या दोन्ही सामन्यात चांगली सुरुवात मिळाली. मात्र मंयकला या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करता आलं नाही. मात्र मयंकने दुसऱ्या सराव सामन्यात अर्धशतकी खेळी केली. मात्र अजूनही मयंकला सूर गवसलेला नाही. या दोन्ही सलामीच्या फलंदाजांमुळे कर्णधार विराटच्या अडचणीत वाढ झालीये.

न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या चुकीतून धडा घेणार का?

टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येण्याआधी न्यूझीलंड दौऱ्यावर गेली होती. या दौऱ्यात न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळली. यामध्ये टीम इंडियाचा 2-0 अशा फरकाने पराभव केला होता. या मालिकेतही रोहितला दुखापतीमुळे मुकावं लागलं होतं. यामुळे या मालिकेत मयंक आणि पृथ्वीने सलामी केली होती. मात्र हे दोघे अपयशी ठरले होते. मयंकला एकूण 4 डावात 102 तर पृथ्वीला 98 धावाच करता आल्या होत्या.

या दोन्ही खेळाडूंची आकडेवारी विराटसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे हे दोघे खेळाडू या मालिकेत कशाप्रकारे कामगिरी करतात, याकडे टीम मॅनेजमेंट आणि क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. तसंच या दोघांवर चांगली कामगिरी करण्याचे दडपण असणार आहे.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड

दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड

तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी

चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन

असा आहे कसोटी संघ : विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराज.

संबंधित बातम्या :

IND Vs AUS : कर्णधार विराट कोहलीला विश्वविक्रमाची संधी

PHOTO | ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामन्यात विजय मिळवून देणारे टीम इंडियाचे स्टार खेळाडू

Ind Vs Aus : अजिंक्य स्वत:ला कर्णधार म्हणून सिद्ध करेल, मराठमोळ्या रहाणेवर विराटला विश्वास

ind vs aus before 1st test these 2 players of team india increased virat kohli troubles