सिडनी : टीम इंडिया (INDIA TOUR AUSTRALIA) कोरोना परिस्थितीनंतर (CORONA) पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर क्रिकेट खेळण्यासाठी गेली आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय, T-20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे. कसोटी मालिकेला 17 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना 17 डिसेंबरला खेळण्यात येणार आहे. या सामन्यावर कोरोना विषाणूचं सावट आहे. यामुळे जर कोरानाचा प्रकोप वाढला, तर कदाचित सामन्याचं ठिकाण बदलावं लागू शकतं, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.ind vs aus corona threat to india australia players will the venue of the first Test change
कसोटी मालिकेतील पहिला सामना अॅडिलेडवर खेळण्यात येणार आहे. हा सामना डे नाईट असणार आहे. विशेष म्हणजे या सामन्यात गुलाबी चेंडूनं खेळण्यात येणार आहे. पण या कसोटीवर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे हा सामना होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जर कोरोनामुळे सामन्याचं ठिकाण बदलावं लागलं, तर पहिली कसोटी मेलबर्नमध्ये खेळवण्यात येण्याची शक्यता आहे. “परिस्थिती बिघडली तर या सामन्याचं आयोजन मेलबर्नमध्ये केलं जाऊ शकतं. या सामन्याच्या आयोजनासाठी मेलबर्न क्रिकेट कल्ब सज्ज आहे”, असं एमसीसीचे प्रमुख स्टुअर्ट फॉक्स म्हणाले.
कोरोनाचा धोका टाळण्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये खबरदारी घेण्यात आली आहे. अनेक राज्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच 14 दिवसांचे क्वारंटाईन बंधनकारक करण्यात आलं आहे.
टीम इंडिया सिडनीमध्ये काही दिवसांपूर्वी दाखल झाली. यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंची आणि इतर सहकाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. सुदैवाने सर्वांच्या चाचणीचा अहवाल नेगिटिव्ह आला. यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी नेट्समध्ये सरावाला सुरुवात केली. टीम इंडियाचा क्वारंटाईन कालावधी 26 नोव्हेंबरला पूर्ण होणार आहे. यानंतर पुढच्याच दिवसांपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला आणि दुसरा एकदिवसीय सामना सिडनीत खेळण्यात येणार आहे. त्यानंतर तिसरा आणि शेवटचा सामना तसेच पहिली टी 20 मॅच कॅनबेरात खेळण्यात येणार आहे. तर उर्वरित 2 टी सामने सिडनीत खेळले जाणार आहे.
कसोटी मालिकेआधी सराव सामने खेळण्यात येणार आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध 2 सराव सामने खेळणार आहे. पहिला आणि दुसरा सराव सामना अनुक्रमे 6-8 डिसेंबर तर 11-13 डिसेंबर दरम्यान खेळण्यात येणार आहे. यानंतर 17 डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.
कसोटी (टेस्ट) मालिका
पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड
दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड
तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी
चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन
संबंधित बातम्या :
CORONA | कोरोनामुळे आर्थिक संकट, क्रिकेटपटूवर फूड डिलिव्हरी करण्याची वेळ
Team India | टीम इंडियाला मिळाला नवा किट स्पॉन्सर, बीसीसीआयची घोषणा
ind vs aus corona threat to india australia players will the venue of the first Test change