IND vs AUS Final | ‘अरे जरा तरी आदर बाळग.. ‘, वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवणाऱ्या मिशेल मार्शला नेटीझन्सनी फटकारले

| Updated on: Nov 20, 2023 | 11:31 AM

फायनलमध्ये भारताला पराभूत करून ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकपवर सहाव्यांदा नाव कोरलं. कालच्या पराभवामुळे लाखो चाहत्याचं मन मोडलं. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे अनेकांनी कौतुक करत अभिनंदन केले. मात्र आता सोशल मीडियावर ऑस्ट्रेलियन खेळाडूचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत तो वर्ल्ड कप ट्रॉफीसोबत दिसत आहे. पण तो फोटो पाहून नेटीझन्स भडकले आहेत.

IND vs AUS Final |  अरे जरा तरी आदर बाळग.. , वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवणाऱ्या मिशेल मार्शला नेटीझन्सनी फटकारले
Follow us on

IND vs AUS Final | रविवारी, 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 गडी राखून पराभव करून सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. भारताच्या पराभवामुळे लाखो चाहत्याचं मन मोडलं. विजयानंतर ऑस्ट्रेलियन संघाच्या सेलिब्रेशनचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र त्यातील एक फोटो पाहून नेटीझन्स हादरलेच. खरंतर त्या फोटोमध्ये ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडू मिशेल मार्श हा वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर पाय ठेवून बसला आहे. हे पाहून हजारो जण या ऑस्ट्रेलियन खेळाडूवर भडकले असून त्याच्यावर टीकास्त्र सोडण्यात येत आहे. पण या फोटोला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

मायक्रोब्लॉगिंग साइट X (पूर्वीचे ट्विटर) वर हा फोटो @mufaddal_vohra याच्या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. या पोस्टला 5 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 11 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हा फोटो शेअर केला जात आहे.

 

अनेक यूजर्सनी यावर प्रतिक्रिया देत मार्शवर टीका केली. हा वर्ल्डकपचा अपमान असल्याचे अनेक युजर्सनी लिहीले आहे. तर काहींनी मात्र ‘ही त्यांची ट्रॉफी आहे, त्यांनी काय वाट्टेल ते करावे’ अशी भूमिका घेतली आहे. मात्र एकंदर बऱ्याच जणांना हा प्रकार आवडला नसल्याचे त्यांच्या कमेंट्समधून दिसत आहे.

 

वर्ल्डकप फायनलमध्ये भारताने प्रथम फलंदाजी करत 240 धावा केल्या, त्याला प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियाने 43 षटकात 241 धावा करत विजय मिळवला. या मॅचमध्ये ट्रॅव्हिस हेडने 137 धावा केल्या आणि मार्नस लॅबुशेनने दमदार खेळीसह नाबाद 58 धावा केल्या.