IND vs AUS : कांगारूंसाठी आश्विन नाम ही काफी है! अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू

| Updated on: Feb 10, 2023 | 12:54 AM

आश्विनने 3 विकेट्स घेतल्या असल्या तरी त्याने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. इतकंच नाहीतर अशी कामगिरी करणार आर. आश्विन पहिला खेळाडू ठरला आहे.

IND vs AUS : कांगारूंसाठी आश्विन नाम ही काफी है! अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू
Follow us on

मुंबई :  भारत आणि ऑस्ट्रेलियामधील पहिल्या कसोटीमध्ये भारतीय खेळाडूंनी पहिला दिवस गाजवला महत्त्वाचं ज्या खेळपट्टीवर त्यांना टिकून खेळताही आलं नाही, त्यावर कर्णधार रोहित शर्माने वनडे स्टाईल बॅटींग करत टीकाकारांची तोंड बंद केलीत. सर रविंद्र जडेजाने जबरदस्त कमबॅक करत कांगारूंच्या बॅटींग ऑर्डरचं कंबरडं मोडलं. तर दुसरीकडे आर. आश्विननेही त्याला साथ दिली. आश्विनने 3 विकेट्स घेतल्या असल्या तरी त्याने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. इतकंच नाहीतर अशी कामगिरी करणार आर. आश्विन पहिला खेळाडू ठरला आहे.

आर. आश्विनने अॅलेक्स कॅरी 36 धावा, कर्णधार पॅट कमिन्स 6 धावा, स्कॉट बोलँड 1 धाव यांना आपली शिकार करत 450 विकेट्स घेतल्या. कसोटी क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून आश्विनने 3000 धावा आणि 450 विकेट्स घेतल्या आहेत. कसोटी इतिहासामध्ये अशी कामगिरी करणारा तो आशिया खंडामधील पहिला खेळाडू ठरला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा विक्रम करणारा तो जगातील चौथा खेळाडू आहे. दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस, ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न व इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड यांचा समावेश आहे.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना अत्यंत खराब सुरूवात केली. मोहम्मद सिराजने उस्मान ख्वाजाला बाद करत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. लगोलग मोहम्मद शमीने खतरनाक डेव्हिड वॉर्नरच्या दांड्या गुल केल्या. त्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन यांनी भागीदारी रचण्यासाठी सुरूवात केली होती. मात्र जडेजाच्या गोलंदाजीवर उत्कृष्ट स्टंम्पिंग करत पदार्पणवीर केएस भरतने लाबुशेनला माघारी पाठवलं त्यानंतर आलेल्या मॅट रेनशॉला जडेजाने पायचीत करत दोन धक्के दिले.

चार विकेट्स गेल्यावर ऑस्ट्रेलियाला काही मोठी भागीदारी करता आली नाही. त्यानंतरच्या राहिलेल्या 6 विकेट्स या जडेजा आणि आश्विनने घेत कांगारूंना 177 धावांवर रोखलं. रोहित शर्मा आणि केएल राहुल सलामीला आले होते. दोघांनी चांगली सुरूवात करून दिली. रोहितने लय पकडली होती त्याने नाबाद 56 धावा केल्या. यामध्ये 9 चौकार आणि 1 षटकार खेचला. मात्र सावध खेळत असलेल्या राहुलला सत्र संपत असताना टॉड मर्फीने आपल्याच गोलंदाजीवर बाद केलं.

दरम्यान, भारत 100 धावांनी पिछाडीवर असून रोहित आणि आश्विन डावाची सूरूवात करतील. भारत किती संघाचं लीड घेणार याकडे सर्व क्रीडाप्रेमींची लक्ष लागलं आहे. रोहित शर्मा आपलं कसोटीमधील शतक करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग 11: पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि स्कॉट बोलँड.

टीम इंडिया प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, एस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.