मुंबई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका संपल्यानंतर आता वनडे मालिका सुरु होणार आहे. 3 सामन्याची पहिला वनडे सामना 17 मार्च रोजी वानखेडे स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. विराट कोहलीने शेवटच्या कसोटी सामन्यात शानदार शतक ठोकलं होतं. आता वनडे मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याला मागे टाकण्याचा आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची बरोबरी साधण्याचा विक्रम नोंदवणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत सर्वाधिक शतकं ठोकण्याचा विक्रम विराट कोहलीला करता येणार आहे. एक शतक ठोकल्यानंतर हिटमॅन रोहित शर्माला मागे टाकणार आहे. कारण रोहित शर्मा कौटुंबिक कारणामुळे पहिल्या वनडे सामन्यात खेळणार नाही.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत सर्वाधिक शतकं ठोकण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने 71 सामन्यात 9 शतकं ठोकली आहेत. तर रोहित शर्मा आणि विराट कोहली संयुक्तिकपणे दुसऱ्या स्थानावर आहेत. रोहितने 40 सामन्यात 8 शतक केले आहेत. तर विराटने 43 सामन्यात 8 शतकं ठोकली आहेत. त्यामुळे या तीन सामन्यात एक शतक ठोकल्यास रोहित शर्माला मागे टाकेल.
विराट कोहली वनडे क्रिकेटमध्ये सध्या चांगलाच फॉर्मात आहे. वर्ष 2023 मध्ये खेळलेल्या 6 वनडेत 2 शतकं ठोकली आहेत. त्याने 67.60 च्या सरासरीने 338 धावा केल्या. रोहित शर्माही फॉर्मही सध्या चांगला आहे. रोहितने 6 सामन्यात 54.66 च्या सरासरीने 328 धावा केल्या. यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. दोन्ही खेळाडूंचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगला रेकॉर्ड आहे. रोहित शर्माने पहिलं द्विशतक ऑस्ट्रेलियाविरुद्धच ठोकलं होतं.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या पाच टॉप खेळाडूंमध्ये तीन भारतीयांचा समावेश आहे. यात सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं नाव येतं. सचिन तेंडुलकरने 71 सामन्यात 44.59 च्या सरासरीने 9 शतकं आणि 15 अर्धशतकांच्या जोरावर 3077 धावा केल्या आहेत.
रोहित शर्माने 40 सामन्यात 61.33 च्या सरासरीने 8 शतकं आणि 8 अर्धशतकांच्या मदतीने 2262 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने 43 सामन्यात 54.81 च्या सरासरीने 8 शतकं आणि 10 अर्धशतकांच्या जोरावर 2083 धावा केल्या आहेत.
वनडे सामन्यासाठी दोन्ही संघाचे खेळाडू
भारतीय संघ : रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, ईशान किशन, केएल राहुल, जयदेव उनाडकट, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमरान मलिक, युजवेंद्र चहल
ऑस्ट्रेलियन संघ : डेविड वॉर्नर, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, अश्टन अगर, कॅमरून ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोईनिस, मिशेल मार्श, अलेक्स करे, जोश इंग्लिस, अडम झाम्पा, मिशेल स्टार्क, नाथन इलिस, सीन अब्बोट