मुंबई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा निर्णायक सामना सुरु आहे. हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघानी आपला जोर लावला आहे. असं असताना या सामन्यादरम्यान काही किस्सेही घडले. दोन झेल सुटले, डीआरएस रिव्ह्यू आणि कुत्र्याची एन्ट्री यामुळे उपस्थित प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन झालं. कुत्र्याने सामन्यात एन्ट्री मारल्यानंतर काही वेळासाठी सामना थांबवण्यात आला. इतकंच काय तर रविंद्र जडेजाही कुत्र्याला पकडण्यासाठी पुढे सरसावला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
पहिल्या डावातील 43 व्या षटकातील तिसरा चेंडू टाकल्यानंतर कुत्र्याने मैदानात एन्ट्री मारली. तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 7 गडी गमवून 227 धावा झाल्या होत्या. सीन अब्बॉट आणि एश्टन अगर ही जोडी मैदानात खेळत होती. कुत्रा मैदानात घुसल्यानंतर मैदानातील कर्मचारी त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होते. सदर प्रकार सुरु असताना रविंद्र जडेजाला राहावलं नाही. त्याने मैदानात आलेल्या कुत्र्यासोबत मस्ती करण्याची संधी गमावली नाही.
#jadeja having some fun with the dog.#INDvsAUS #Chepaukstadium pic.twitter.com/ODRnuo5q5b
— Asvanth (@asvanth1808) March 22, 2023
Babar Azam tried to disturb the 3rd ODI between India and Australia.#INDvsAUS #Cricket #CricketTwitter pic.twitter.com/mBKpoW3rGC
— ?⭐? (@superking1815) March 22, 2023
मैदानातील दोन कर्मचारी कुत्र्याच्या मागे धावत असताना एक कर्मचारी पडला. त्यामुळे समालोचकांनाही आपलं हसू आवरलं नाही. कर्णधार रोहित शर्माही मैदानात हसत होता. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी20 सामन्यात अशीच एका सापाने एन्ट्री मारली होती. साप पाहून खेळाडूंची भंबेरी उडाली होती. भारतीय डावाच्या सातव्या षटकात सापाने मैदानात एन्ट्री मारली होती. तेव्हा सलामीवीर केएल राहुलने साप असल्याचं दाखवलं होतं.
ऑस्ट्रेलियाने या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 49 षटकात सर्व गडी गमवून 269 धावा केल्या आणि विजयासाठी 270 धावांचं आव्हान दिलं आहे. भारताकडून हार्दिक पांड्याने 3, कुलदीप यादवने 3, मोहम्मद सिराजने 2 आणि अक्षर पटेलने 2 गडी बाद केले.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन) , शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ (क), मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स केरी (विकेटकीपर), मार्कस स्टॉइनिस, अॅश्टन आगर, शॉन अॅबॉट, मिचेल स्टार्क आणि अॅडम झॅम्पा.