मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चार सामन्यांची बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका सुरू आहे. टीम मॅनेजमेंट दिल्लीमध्ये होणाऱ्या सामन्यासाठी संघात मोठा बदल करणार असल्याची चर्चा आहे. भारताने पहिला कसोटी सामना एक डाव आणि 132 धावांनी जिंकून चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसरा सामना जिंकत आपली आघाडी मजबूत करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे. मात्र दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा एका खेळाडूला डच्चू देण्याची शक्यता आहे.
दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर दुसरा कसोटी सामना होणार आहे. आता अंतिम अकरामधून ज्या खेळाडूला गेल्या काही दिवसांपासून विरोध होत आहे त्याला वगळलं जावू शकतं. माजी खेळाडूंनीही या प्लेअरल अंतिम अकरामध्ये स्थान देण्यात येत त्यावरून टीका केली आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून भारतीय संघाचा उपकर्णधार के. एल. राहुल आहे. 17 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या कसोटीमध्ये राहुलच्या निवडीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
नागपूरमधील कसोटीतही राहुलकडून शतकी खेळीची अपेक्षा होती. मात्र राहुलने अवघ्या 20 धावा करत पुन्हा एकदा सर्वांची निराशा केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार रोहित शर्मा केएल राहुलला वगळून शुबमन गिलला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देऊ शकतो. शुबमन गिलने आपल्या चमकदार कामगिरीने निवड समितीला विचार करण्यासाठी भाग पाडलं आहे.
वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी, शुबमन गिल कसोटी, एकदिवसीय आणि T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे. शुबमन गिलने भारतासाठी 13 कसोटी सामन्यांमध्ये 1 शतक आणि 5 अर्धशतकांसह 736 धावा केल्या आहेत. राहुलच्या जागी गिलला संधी देण्यात यावी अशी मागणी क्रीडा चाहत्यांनी केली होती.
दरम्यान, एकट्याच्या जिवावर तो भारताला सामना जिंकून देऊ शकतो. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या बॉर्डर गावसकर मालिकेमध्ये गिलने आपल्या कामगिरीने सर्वांना भुरळ पाडली होती. भारतीय संघाच्या भविष्याचा विचार करता त्याला बीसीसीआने संधी द्यावी अशी चर्चा क्रीडा वर्तुळात कायम पाहायला मिळते. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात रोहित गिलला संधी देतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कसोटीसाठी भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजार, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सूर्यकुमार यादव