नागपूर : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने कांगारूंचा दोनशे धावांच्या आता गाशा गुंडाळला. अवघ्या 177 धावांवर त्यांना ऑल ऑऊट केलं. सर जडेजाने केलेल्या कमाल कामगिरीच्या जोरावर भारताने कांगारूंना रोखलं आहे. भारतीय गोलंदाजांच्या फिरकीसमोर कांगारूंच्या बॅट्समननी सपशेल नांगी टाकली. भारताचा स्टार खेळाडू कोहलीने सामन्यामध्ये एक मोठी चूक होती नशिबाने त्याचा भारतीय संघाला फटका बसला नाही. मात्र त्याच्या नावावर एका लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद झाली.
विराट कोहलीने स्टीव्ह स्मिथचा कॅच सोडला होता. एक चपळ आणि संघातील महत्त्वाचा खेळाडू म्हणून गणला जातो. विराट कोहलीने हा झेल सोडत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 कॅच सोडले आहेत. स्मिथचा कॅच सोडला आणि कोहलीच्या नावावर या लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. कोहलीच्या नावावर एका खराब शतक झालं आहे. कोहलीने आतापर्यंत 295 धावांनी कॅच घेतले आहेत.
भारतीय संघाने सुरूवातीला दोन धक्के दिले त्यानंतर मैदानात कांगारूंचा मार्नस लॅबुशेनन उतरला. दोघांनी भागीदारी रचायला सुरूवात केली होती. रोहित शर्माला माहित होतं की या जोडीने मैदानात तळ ठोकला की भारतासाठी अडचणीचं ठरू शकतं. त्यावेळी रोहितने एक चाल केली होती. अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने 15 षटकामध्ये स्मिथला चकवलं, स्लीपमध्ये उभ्या असलेल्या विराट कोहलीकडे झेल गेला. मात्र त्यावेळी कोहली तो झेल पकडण्यात अपयशी ठरला.
Chamiya Chokli Once again #Dropped the catch ???#Chokli #INDvsAUS #BorderGavaskarTrophy pic.twitter.com/iVZax50p8o
— RO45GOAT (@KrishVJICT) February 9, 2023
कोहलीच्या दिशेने बॉल वेगाने आला सावध असतानाही त्याच्या हातात बॉल काही स्थिरावला नाही. मात्र कोहलीसारख्या खेळाडूकडून कॅच सुटल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. कारण स्टीव्ह स्मिथला जीवदान मिळाल होतं, जडेजाने त्याला बाद केलं पण कोहलीकडून मिळालेलं जीवदान भारतीय संघासाठी धोक्याचं ठरलं असतं.
दरम्यान रवींद्र जडेजाने घेतलेल्या 5 विकेट्समुळे ऑस्ट्रेलियाचा डाव लवकर आटोपला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 177 धावांवर ऑलआऊट केलं. जडेजाने ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख 5 फलंदाजांना आऊट केलं.
जडेजाने एकूण 22 ओव्हर टाकल्या. या 22 ओव्हरमध्ये त्याने 8 षटकं ही निर्धाव टाकली. तर 47 रन्स देत 5 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. जडेजाने मार्नल लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब आणि टॉड मर्फी या पाच जणांचा काटा काढला.
टीम इंडिया प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, एस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि स्कॉट बोलँड.