मुंबई : रविद्र जडेजाला (Ravindra Jadeja) गुडघ्याच्या दुखण्यामुळे विश्वचषक स्पर्धेसह (T20 World Cup) अनेक मालिकेला मुकावे लागले आहे. रवींद्र जडेजा टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू आहे. टीम इंडिया सध्या न्यूझिलंड (NZ) दौऱ्यावर आहे. काल टीम इंडियाची T20 मालिका संपली, तिसरी मॅच टाय झाल्यामुळे T20 मालिका टीम इंडियाने जिंकली. आता एकदिवसीय मालिका होणार आहे. त्या टीमचं नेतृत्व शिखर धवनकडे देण्यात आलं आहे.
पुढच्या महिन्यात बांगलादेश दौरा होणार आहे. एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. त्यासाठी निवड समितीने टीम जाहीर केली होती. परंतु रवींद्र जडेजा हा खेळाडू अजून तंदुरुस्त नसल्याने त्यांच्या जागेवर सुर्यकुमार यादवला संधी मिळण्याची शक्यता आहे.
सुर्यकुमार यादव सध्या चांगल्या फॉर्ममध्ये मागच्या अनेक दिवसांपासून तो सातत्याने धावा करीत आहे. विश्वचषक स्पर्धेत अनेक दिग्गज गोलंदाजांना त्याने घाम फोडला. नुकत्याचं न्यूझिलंडविरुद्ध झालेल्या T20 मालिकेत सुद्धा त्याने दुसऱ्या मॅचमध्ये चांगली खेळी केली. त्यामुळे रवींद्र जडेजाच्या जागेवर त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.
भारताचा एकदिवसीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शारदल सुंदर ठाकूर, मो. शमी, मोहम्मद. सिराज, दीपक चहर, यश दयाल.
भारताचा कसोटी संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर. शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव.