मुंबई : टीम इंडिया (IND) आणि बांगलादेश (BAN) यांच्यात आज दुसरा एकदिवसीय सामना होणार आहे. पहिला सामना बांगलादेश टीमने जिंकल्यामुळे आजचा सामना टीम इंडियाला जिंकावा लागणार आहे. कारण टीम इंडियाचा आजच्या सामन्यात पराभव झाल्यास बांगलादेश टीम ही मालिका जिंकणार आहे. त्यामुळे आजची मॅच (Today Match) टीम इंडियासाठी करो या मरो अशी स्थिती आहे.
पहिला सामना इंडिया आणि बांगलादेश यांच्यात रोमांचक झाला. टीम इंडिया सामना जिंकणार अशी स्थिती असताना, बांगलादेशच्या अंतिम टप्प्यातील खेळाडूंनी मोठी भागीदारी करुन बांगलादेश टीमला विजय मिळवून दिला. त्यानंतर बांगलादेश टीमचं चाहत्यांनी सोशल मीडियावर जोरदार कौतुक केलं. त्याचबरोबर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासह अनेक खेळाडूंवर चाहत्यांनी जोरदार टीका केली.
सध्याचा दौरा टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी अधिक महत्त्वाचा आहे. कारण इंडियामध्ये पुढच्यावर्षी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. त्या टीममध्ये ज्या खेळाडूंना संधी हवी असेल, त्यांना सध्याच्या मालिकेत चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
आज शेर-ए-बांग्ला स्टेडियममध्ये टीम इंडियाचा दुसरा एकदिवसीय सामना होणार आहे. आजच्या सामन्यात पाऊस पडण्याची शक्यता कमी असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. आज साडेअकरा वाजता मॅच सुरु होईल.
टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, कुलदीप सेन, उमरान मलिक.
बांगलादेश टीम
लिटन दास (कर्णधार, यष्टिरक्षक), नजमुल हुसेन शांती, यासिर अली, आसिफ हुसैन, महमुदुल्लाह रियाद, मेहदी हसन मिराज, शकीब अल हसन, मुस्तफिजुर रहमान, नमस अहमद, इबादत हुसेन.