अहमदाबाद : भारताविरुद्ध कसोटी मालिकेत झालेल्या पराभवाचा बदला इंग्लंड संघाने (Ind vs Eng T20) पहिल्याच टी 20 सामन्यात घेतला. अहमदाबादेत नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या पहिल्या टी 20 सामन्यात इंग्लंडने भारताचा 8 विकेट्सने दणदणीत पराभव करुन मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी मात्र साफ निराशा केली. (Indian batsmen’s first T20 disappointment). श्रेयस अय्यर (Shreyas Ayyar) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) वगळता भारतीय फलंदाजांनी साफ निराशा केली. निर्धारित 20 षटकांमध्ये भारताला केवळ 125 धावा करता आल्या. भारताने दिलेलं आव्हान इंग्लंडने अगदी सहज पूर्ण केलं. या सामन्यात भारतीय संघाची टॉप ऑर्डर (वरच्या क्रमांकावरील फलंदाज) सपशेल अपयशी ठरले. संघाच्या अपयशाचं खापर आता कर्णधार विराट कोहलीच्या माथ्यावर फोडलं जात आहे. (Ind vs Eng T-20 : Virender Sehwag says I will turn of my TV if Rohit Sharma will not play)
या सामन्यात भारतीय कर्णधाराने धडाकेबाज फलंदाज आणि क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील भारताचा सलामीवीर रोहित शर्माला विश्रांती देत त्याच्या जागी शिखर धवनला सलामीला पाठवले. धवन या सामन्यात पूर्णपणे फ्लॉप गेला. या सामन्यात त्याला 12 चेंडूत केवळ 4 धावा करता आल्या. रोहित शर्मा उपलब्ध असूनही त्याला संघाबाहेर ठेवण्याचा कर्णधार विराट कोहलीचा निर्णय त्याच्या चांगलाच अंगाशी आला आहे. त्यामुळे जगभरातील क्रिकेटरसिक, क्रिकेट समीक्षक विराट कोहलीवर टीकेचा भडीमार करत आहेत. भारतीय संघाचा माजी शिलेदार विरेंद्र सहवाग यानेही विराट कोहलीला चांगलंच सुनावलं आहे.
पहिल्या टी-20 सामन्यात रोहितला विश्रांती देण्यात आल्यामुळे विरेंद्र सहवाग कर्णधाराच्या निर्णयावर नाराज आहे. क्रिकबझशी बोलताना सहवाग म्हणाला, “विराट म्हणाला की रोहित शर्मा पहिल्या दोन टी-20 सामन्यांमध्ये खेळणार नाही, पण जर भारत हरला तर ही रणनीती कायम राहील का? पराभवामुळे संघावर खूप फरक पडतो. मी कर्णधार असतो तर मी माझा सर्वोत्कृष्ट संघ मैदानात उतरवला असता. रोहित शर्मा उपलब्ध असल्यास मी त्याला मैदानात उतरवणारच. प्रेक्षक रोहित सारख्या खेळाडूंना पाहण्यासाठी येतात. मी स्वतः त्याचा चाहता आहे. जर तो खेळला नाही तर माझा टीव्ही बंद राहील. रोहितसारखा भरवशाचा आणि आक्रमक फलंदाज उपलब्ध असूनही त्याला विश्रांती देण्याचा निर्णय सहवागला पटलेला नाही.
भारताकडून सलामीला उतरलेले शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि के.एल.राहुल (KL Rahul) स्वस्तात माघारी परतले. पहिल्या चार ओव्हरमध्ये के.एल. राहुल, शिखर धवन, कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले होते. एकवेळ तर 3 गडी बाद 20 रन्स, अशी भारतीय संघाची अवस्था झाली होती. एकंदर भारतीय टॉप ऑर्डर बॅट्समनने साफ निराशा केली. इंग्लंडने गोलंदाजीची सुरुवात फिरकीपटू आदिल रशीदपासून करत भारतीय संघाला आश्चर्याचा धक्का दिला. आदिलने सगळ्यात स्वस्त गोलंदाजी तर केलीच पण कर्णधार विराट कोहलीची बहुमूल्य विकेट देखील मिळवली. सलामीवीर के.एल.राहुलचा अडथळा जोफ्रा आर्चरने दूर केला. तर वुडने शिखरला स्वस्तात माघारी धाडलं.
कसोटी क्रिकेटमध्ये भन्नाट फॉर्ममध्ये असलेल्या रिषभ पंतने चौथ्या क्रमांकावर येत काही काळ फटकेबाजी केली. ड्रेसिंग रुममधूनच येताना रिषभ अतिशय आत्मविश्वासाने भरलेला दिसून येत होता. खेळपट्टीवर आल्यानंतरही रिषभने काही आत्मविश्वासाने भरलेले तगडे शॉट मारले. जोफ्रा आर्चरला त्याने रिव्हर्स फ्लिकचा अफलातून शॉट मारला. कसोटीनंतर पुन्हा एकदा त्याने हा शॉट खेळल्यावर सगळं स्टेडिअम त्याच्याकडे पाहत राहिलं. मात्र धावसंख्येचा वेग वाढवण्याच्या नादात रिषभ 21 रन्स करुन आऊट झाला.
प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाचे टॉप ऑर्डरमधील फलंदाज अपयशी ठरले. केएल राहुल, शिखर धवन आणि विराट कोहली स्वसतात बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने टीम इंडियाचा डाव सावरला. श्रेयसने फटकेबाजी करत 48 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकारासह 67 धावांची खेळी केली
हार्दिक पांड्याने मोठे शॉट्स खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला यामध्ये तितकंस यश आलं नाही. 21 बॉलमध्ये 19 धावा करुन हार्दिक बाद झाला. शेवटी भारतीय संघाला निर्धारित 20 ओव्हरमध्ये 125 धावाच करता आल्या.
दुसरीकडे भारतीय संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने शानदार सुरुवात केली. जोस बटलर आणि जेसन रॉय या सलामी जोडीने पावरप्लेच्या 6 ओव्हरमध्ये जोरदार फटेकाबाजी केली. पॉवरप्ले मध्येच या जोडीने सलामी अर्धशतकी भागीदारी केली. इंग्लंडकडून जेसन रॉयने सर्वाधिक 49 धावांची खेळी केली. इंग्लंडने पहिल्या टी 20 सामन्यात टीम इंडियावर 8 विकेट्सने शानदार विजय मिळवला.
I did not watch yesterday’s match #INDvENG But have a question – What’s the logic of making your best Batsman @ImRo45 sit in the dugout for the first game of a new series?I understand resting in the last two games if you are leading the series. @BCCI #TeamIndia #RohitSharma
— Anshuman Jha (@theanshumanjha) March 13, 2021
#INDvENG #RohithSharma #RohitSharma #ViratKohli @BCCI @ICC @ImRo45 @vikrantgupta73 @virendersehwag @imVkohli pic.twitter.com/bpcR4u71fS
— Padhiyar Jitendrasinh (@Padhiyarbapu) March 13, 2021
Why the Best T20I opener batsman didn’t play in 1st T20I …
Being a Rohitian is not that much easy … ?#Hitman #RohitSharma #ForeverRohitFan
— Vijay Joshi (VJ) (@Call__Me_VJ) March 13, 2021
हे ही वाचा :
Yuzvendra Chahal | युझवेंद्र चहलची विक्रमाला गवसणी, ‘यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमराहचा रेकॉर्ड ब्रेक
(Ind vs Eng T-20 : Virender Sehwag says I will turn of my TV if Rohit Sharma will not play)