पुणे : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India Vs England 2nd ODI) यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना आज खेळवला जात आहे. या सामन्यात इंग्लडने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. आजच्या सामन्यात भारताची सुरुवात चांगली झाली नाही. सामन्याच्या सुरुवातीलाच भारताचे दोन्ही सलामवीर स्वस्तात परतले. रोहित शर्मा (25) आणि शिखर धवन (4) त्यांच्या नावाला साजेशी कामगिरी करु शकले नाहीत. 37 धावांवर 2 गडी बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी भारताचा डाव सावरला. (Ind vs Eng 2nd ODI : KL Rahul Hits 5th Century, Rishabh pant-Hardik pandya attacks, India Post 336 Runs)
विराटने 79 चेंडूत 66 धावा फटकावल्या. विराट आज खूप संयमाने खेळला. परंतु आज पुन्हा एकदा विराट शतक लगावू शकला नाही. तसेच विराट आज पुन्हा एकदा आदिल रशीदच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला. विराट बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या ऋष पंतने इंग्लिश गोलंदाजांचं कंबरडं मोडलं. पंतने प्रत्येक गोलंदाजांवर हल्लाबोल केला. ऋषभ पंतने अवघ्या 40 चेंडूत 3 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 77 धावा फटकावल्या. तर के. एल राहुलने आज शतक झळकावलं. राहुलने 114 चेंडूत 7 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 108 धावा फटकावल्या.
के. एल. राहुल बाद झाल्यानंतर ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्याने इंग्लंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दोघांनी मिळून तब्बल 11 षटकार ठोकले. पंत बाद झाल्यानंतर हार्दिक पंड्याने धावगती कायम ठेवली. पंड्याने 16 चेंडूत 1 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 35 धावा फटकावल्या. पंतने 7 तर पंड्याने 4 षटकार ठोकून पुण्याचे गहुंजे मैदान दणाणून सोडलं. दोघांनी मिळून 11 षटकार ठोकले. कृणाल पंड्या 12 धावांवर नाबाद राहिला. आजच्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी एकूण 14 षटकार आणि 20 चौकार फटकावले.
भारतीय संघाने इंग्लंडला पहिल्या सामन्यात 66 धावांनी पराभूत करुन मालिकेत विजयी सुरुवात केली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. आजही दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात धडाकेबाज विजय नोंदवून मालिका खिशात घालण्याचा भारत पुरेपूर प्रयत्न करताना दिसेल. तर पहिल्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्न इंग्लंडची टीम करेल. हा सामना जिंकण्यासाठी भारताला इंग्लंडच्या सलामीवीरांची विकेट लवकर मिळवावी लागेल.
संबंधित बातम्या
पाकिस्तानपर्यंत पोहोचली ‘कृष्णा’ची ‘प्रसिद्धी’, शोएब अख्तर म्हणतो, ‘त्याची बोलिंग म्हणजे करिश्मा!’
(Ind vs Eng 2nd ODI : KL Rahul Hits 5th Century, Rishabh pant-Hardik pandya attacks, India Post 336 Runs)