अहमदाबाद : टीम इंडियाचा (Team India) प्रमुख गोलंदाज यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीतून माघार घेतली आहे. बुमराहने वैयक्तिक कारणामुळे चौथ्या टेस्टमधून माघार घेतली आहे. याबाबतची माहिती बीसीसीआयने (Bcci) ट्विट करत दिली आहे. वैयक्तिक कारणांमुळे बुमराहने सुट्टीची मागणी केली होती, यामुळे त्याला रजा मंजूर करण्यात आली आहे, असं बीसीसीआयने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. त्यामुळे आता बुमराह चौथ्या कसोटीत खेळताना दिसणार नाही. दरम्यान आता अशी माहिती मिळाली आहे की बुमराह केवळ चौथ्या कसोटीतच नव्हे तर इंग्लंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय आणि टी-20 मालिकेतही खेळणार नाही. बुमराहच्या जागी नव्या गोलंदाजांना टीम इंडियात संधी दिली जाऊ शकते. (Ind vs Eng Jasprit Bumrah will also be rested for T20 and ODI series against England)
बुमराह इंग्लंडिविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात खेळणार नाही, हे निश्चित आहे. अशातच त्याने पुढील एकदिवसीय आणि टी-20 मालिकेतून माघार घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. बुमराह आता थेट आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे, असे बोलले जात आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना गुरुवारपासून (4 मार्च) अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये पाच टी -20 सामने खेळवले जातील. यानंतर 23 मार्चपासून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाईल. यंदा एप्रिल-मेमध्ये आयपीएल होणार आहे, याचदरम्यान, बुमराह कमबॅक करेल. बीसीसीआयने अद्याप आयपीएलचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही.
NEWS – Jasprit Bumrah released from India’s squad
Jasprit Bumrah made a request to BCCI to be released from India’s squad ahead of the fourth Test owing to personal reasons.
More details – https://t.co/w2wlfodmq8 #INDvENG pic.twitter.com/mREocEuCGa
— BCCI (@BCCI) February 27, 2021
बीसीसीआयने (BCCI) एका निवेदनात म्हटले आहे की, बुमराहने त्याला संघातून रिलीज करण्याची विनंती मंडळाकडे केली होती, ती मान्य करण्यात आली आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, आता बुमराह थेट आयपीएलमध्ये परतणार आहे. सततच्या क्रिकेटमुळे खेळाडूंना ब्रेकची गरज असते. दरम्यान, बुमराहच्या अनुपस्थितीत टीम इंडियात नवीन खेळाडूंना संधी मिळेल. बुमराह इंग्लंडविरुद्ध आतापर्यंत केवळ 2 सामने खेळला आहे. चेन्नईत झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात बुमराहने अनेक षटकं गोलंदाजी केली परंतु त्याला फारसे यश मिळू शकले नाही. यानंतर त्याला दुसऱ्या कसोटीसाठी विश्रांती देण्यात आली. बुमराहने अहमदाबादमध्ये डे-नाईट टेस्टमध्ये पुनरागमन केले.
जसप्रीत बुमराह टीम इंडियाच्या गोलंदाजीचा मुख्य कणा आहे. बुमराहने अनेकदा टीम इंडियासाठी निर्णायक भूमिका बजावली आहे. आपल्या भेदक माऱ्याच्या जोरावर बुमराहने भारताला एकहाती विजय मिळवून दिला आहे. बुमराहला इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत फार यश आले नाही. मात्र तरीही त्याने पाहुण्यांवर नियंत्रण मिळवलं होतं.
या मालिकेतील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना 4 ते 8 मार्चदरम्यान खेळवण्यात येणार आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा सामना जिंकून इंग्लंडचा एकतर्फी मालिका पराभव करण्याचा मानस टीम इंडियाचा असेल.
टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी इंग्लंड विरुद्धच्या चौथा कसोटी सामना जिंकावा किंवा अनिर्णित राखावा लागणार आहे. त्यामुळे टीम इंडिया या चौथ्या कसोटीत कशाप्रकारे कामगिरी करते, याकडे सर्व क्रिकेट विश्वांच लक्ष असणार आहे. या कसोटी मालिकेनंतर 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. हे पाचही सामने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियवर खेळण्यात येणार आहे.
विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (व्हीसी), केएल राहुल, हार्दिक पंड्या, रिषभ पंत (विकेटकीपर), रिद्धीमान साहा (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल , वॉशिंग्टन सुंदर, ईशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज.
Vijay Hazare Trophy | सूर्यकुमार यादवची तडाखेदार खेळी, 15 चेंडूत चोपल्या 60 धावा, इंग्लंडला टी 20 मालिकेत पाणी पाजण्यासाठी सज्जhttps://t.co/20m88x43hn
| #VijayHazareTrophy | #SKY | #SuryakumarYadav | #Mumbai | #MumVHp | #VijayHazareTrophy2021 |
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 1, 2021
संबंधित बातम्या
On This Day : हुक मारके दिखा ! अख्तरने सेहवागला डिवचलं अन सचिनने शोएबच्या गोलंदाजीवर ठोकला सिक्सर
(Ind vs Eng Jasprit Bumrah will also be rested for T20 and ODI series against England)