पुणे : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आक्रमक बॅट्समन के.एल.राहुलची (K L Rahul) बॅट चांगलीच बोलली. त्याच्या बॅटने टीकाकारांची तोंडं बंद केली. साहेबांच्या गोलंदाजीचा राहुलने यथेच्छ समाचार घेतला. राहुलने 114 चेंडूत 108 धावांची खेळी करताना 7 चौकार आणि 2 उत्तुंग षटकार लगावले. यादरम्यान शानदार शतक झळकावल्यानंतर राहुलने सेलिब्रेशनही खास अंदाजात केलं. याच खास सेलिब्रेशन पाठीमागचं गुपीत के.एल. राहुलने सामन्यानंतर सांगितलं. (Ind vs Eng KL Rahul reveal unique Celebration After Century)
दुसऱ्या वन डे सामन्यात के.एल. राहुलने शानदार शतक झळकावलं. शतकानंतर त्याने खास सेलिब्रेशन केलं. पहिल्यांदा दोन्ही डाळे झाकले आणि त्यानंतर दोन्ही हातांची बोटे कानाजवळ नेली. एकंदरिच त्याच्या या कृतीतून त्याला काहीतरी संदेश द्यायचा आहे, हे भारतीय क्रिकेट फॅन्सला कळालं नाही. पण सामना संपल्यानंतर के.एल. राहुलने त्याची कृती समजावून सांगितली.
“माझं सेलिब्रेशन हे बाहेर उठलेल्या आवाजाला शांत करण्यासाठी होतं. याचा अर्थ असा नाही की मला त्यांना अपमानित करायचं होतं. काही लोक तुम्हाला अनेकदा पाण्यात बघत असतात. बहुदा त्यांच्यावर लक्ष देण्याची गरज नसते. यासाठीच बाहेरच्या आवाजाला शांत करण्यासाठी माझं सेलिब्रेशन होतं,” अशी राज की बात के.एल. राहुलने सांगितली.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात टी ट्वेन्टी मालिका पार पडली. परंतु या मालिकेत राहुलची बॅट बोलली नाही. तो जर चांगली कामगिरी करत नसेल तर त्याला संघात का ठेवलंय, असा सवाल अनेक क्रिकेटपटूंनी केला. हाच सवाल क्रिकेट फॅन्सही विचारत होते. अगदी याचवरुन वीरेंद्र सेहवागने कर्णधार विराटवर टीकाही केली. पण विराट राहुलच्या साथीला खंबीरपणे उभा राहिला. तो एक मॅचविनर खेळाडू आहे. जेव्हा त्याचा परफॉर्मन्स होत नसतो तेव्हा अशा खेळाडूपाठीमागे उभं राहायला हवं, असं सांगत विराट राहुलला संधी देत राहिला.
विराटचा विश्वास सार्थ ठरवत पुण्यात पहिल्या एकदिवसीय सामन्यात राहुलचा फॉर्म परत आला. पहिल्याच सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी केली. तर शुक्रवारच्या दुसऱ्या सामन्यात त्याने आक्रमक पद्धतीने शतक झळकावून टीकाकारांची तोंडं बंद केली. त्याचमुळे त्याने अशा प्रकारचं सेलिब्रेशन केलं.
(Ind vs Eng KL Rahul reveal unique Celebration After Century)
हे ही वाचा :