अहमदाबाद : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच टी -20 सामन्यांची मालिका पहिल्या दोन सामन्यांनंतर बरोबरीत राहिली आहे. पहिला सामना इंग्लंडने (England), तर दुसरा सामना टीम इंडियाने जिंकला. आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा सामना अहमदाबाद येथील मोटेराच्या नव्याने बनवलेल्या स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यात कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे प्रेक्षकांना स्टेडियमवर येण्याची परवानगी दिली जाणार नसली तरी यामुळे सामन्यातील थरार अजिबात कमी होणार नाही. तिसरा सामना जिंकून मालिकेत आघाडी मिळवण्यासाठी दोन्ही संघांनी कंबर कसली आहे. दरम्यान, या सामन्यात भारतीय संघात बदल होणे अपेक्षित आहे. (IND vs ENG : Rohit sharma can make comeback in third t20, Indian Team Playing Eleven)
खरंतर पहिल्या टी -20 मध्ये नाणेफेक झाल्यानंतर विराट कोहलीने भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली तेव्हा त्यात रोहित शर्माचे नाव न दिसल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. त्यानंतर विराटने स्पष्ट केले की, पहिल्या दोन सामन्यांसाठी रोहितला विश्रांती देण्यात आली आहे. अशा स्थितीत के. एल. राहुलसह शिखर धवन सलामीला आला आणि दोन्ही फलंदाजांनी तमाम भारतीयांची निराशा केली. धवनला याचा फटका बसला. त्यामुळे दुसर्या टी-20 मध्ये त्याला संघातून वगळण्यात आले. त्याच्या जागी युवा फलंदाज इशान किशनला संधी देण्यात आली. किशनने या संधीचं सोनं केलं. पदार्पणाच्या सामन्यात त्याने धडाकेबाज अर्धशतकी खेळी करत भारताला दुसऱ्या टी-20 सामन्यात विजय मिळवून दिला. त्यामुळे तिसऱ्या टी-20 सामन्यात त्याची निवड पक्की झाली. तर दुसऱ्या टी-20 सामन्यात के. एल. राहुल पुन्हा एकदा अपयशी ठरला. राहुल पहिल्या सामन्यात एक धाव करुन बाद झाल तर दुसऱ्या सामन्यात त्याला भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे तिसऱ्या टी-20 सामन्यात राहुलला वगळले जाऊ शकते.
रोहितला तिसऱ्या सामन्यात भारतीय संघात संधी द्यायची असेल तर किशन किंवा राहुल दोघांपैकी एकाला वगळावे लागेल. किशनचा पहिल्या सामन्यातील परफॉर्मन्स पाहता त्याला वगळण्याची चूक कोणीही करणार नाही. तर दुसऱ्या बाजूला दोन सामन्यांमध्ये केवळ एक धाव करणाऱ्या के. एल. राहुलचं संघातील स्थान अनिश्चित मानलं जातंय. त्यामुळे तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघ रोहित शर्मा आणि इशान किशन या दोघांसह मैदानात उतरेल. राहुलच्या जागी रोहितला या सामन्यात संधी दिली जाईल. उर्वरित भारतीय संघ मजबूत असल्याने या बदलांशिवाय भारतीय संघात इतर कोणताही बदल होणार नाही, असं म्हटलं जात आहे.
रोहित शर्मा गेल्या सव्वा वर्षात एकही आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळलेला नाही. त्यामुळे रोहित या सामन्यात कसा खेळतो, याकडे जगभरातील क्रिकेटरसिकांचे लक्ष लागले आहे. तिसऱ्या सामन्यात रोहित आणि इशान सलामीला येतील. त्यानंतर कर्णधार विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या असा फलंदाजीचा क्रम आजच्या सामन्यात पाहायला मिळू शकतो.
रोहित शर्मा, इशान किशन, विराट कोहली, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, युजवेंद्र चहल, वाशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकुर.
संबंधित बातम्या
India vd England 2nd T2OI | शानदार विजयानंतरही टीम इंडियाला मोठा धक्का
Suryakumar Yadav | टी 20 डेब्यूनंतर मुंबईकर सूर्यकुमार यादवची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला….
(IND vs ENG : Rohit sharma can make comeback in third t20, Indian Team Playing Eleven)