नवी दिल्ली : विश्वचषक स्पर्धेच्या (T20 World Cup 2022) सेमीफायनलच्या पहिल्या मॅचमध्ये पाकिस्तानच्या टीमने (PAK) न्यूझिलंडचा (NZ) पराभव केला. आज एडलेडच्या मैदानात दुपारी दीडवाजल्यापासून टीम इंडियाचा आणि इंग्लंडचा (IND vs ENG) मुहामुकाबला चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. आजच्या सामन्यात ज्या टीमचा विजय होईल, ती टीमचा सामना फायनलमध्ये पाकिस्तान टीमशी होणार आहे. आजच्या सामन्याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
दहा वर्षानंतर पुन्हा एकदा टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात सेमीफायनलचा सामना होणार आहे. त्यावेळी टीम इंडियाने इंग्लंडला नमवून सहज विजय मिळविला होता. आज टीम इंडिया कशी कामगिरी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
सुर्यकुमार यादव सद्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याला रोखणे इंग्लंडच्या गोलंदाजांसाठी मोठं आव्हान आहे. सुर्यकुमार यादवचं वादळ रोखण्यासाठी इंग्लंडच्या टीमने स्पेशल मिंटिंग घेतली आहे. त्या मिटिंगमध्ये सगळे दिग्गज असल्याची सुद्धा माहिती एका वेबसाईटने दिली आहे.
रेकॉर्ड
22 वेळा मॅच झाली
टीम इंडिया 12 वेळा जिंकली
इंग्लंड टीम 10 वेळा जिंकली
T20 विश्वचषकात 3 वेळा आमनेसामने
भारत 2 वेळा जिंकला
इंग्लंड टीम 1 जिंकली
2007 – भारत 18 धावांनी जिंकला
2009 – इंग्लंड 3 धावांनी विजयी
2012 – भारत 90 धावांनी विजयी
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विश्व के.), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
इंग्लंड संघ
जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, अॅलेक्स हेल्स, हॅरी ब्रूक, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल रशीद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड .