मुंबई : दोन दिवसांनी टीम इंडिया (IND) आणि न्यूझिलंड (NZ) यांच्यात T20 चा पहिला सामना होणार आहे. टीम इंडियात मोठा बदल करण्यात आला आहे. हार्दीक पांड्याच्या (Hardik Pandhya) नेतृत्वात टीम इंडिया कशी कामगिरी करणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे प्रशिक्षक म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मणला जबाबदारी देण्यात आली आहे.
वेलिंगटनच्या मैदानावर T20 चा पहिला सामना होणार आहे. तिथं न्यूझिलंडच्या हवामान खात्याने पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. दुपारच्यानंतर मैदानावर जोराचा पाऊस होईल आणि हवेचा वेग सुद्धा वाढलेला असेल अशी माहिती एका वेबसाईटने दिली आहे.
पहिला T20 सामना – 18 नोव्हेंबर – स्काय स्टेडियम, वेलिंग्टन
दुसरा T20 सामना – 20 नोव्हेंबर – बे ओव्हल माउंट मौनगानुई
तिसरा T20 सामना – 22 नोव्हेंबर – मॅक्लीन पार्क, स्काय स्टेडियम
पहिला एकदिवसीय – 25 नोव्हेंबर – ईडन पार्क, ऑकलंड
दुसरी वनडे – २७ नोव्हेंबर – सेडन पार्क, हॅमिल्टन
तिसरी एकदिवसीय – 30 नोव्हेंबर – हॅगली ओव्हल, क्राइस्टचर्च
टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया
हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋषभ पंत, शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र, चहलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक
वनडे मालिकेसाठी टीम इंडिया
शिखर धवन, ऋषभ पंत, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.