IND vs NZ: आज होणार T20 मालिकेतील निर्णायक सामना, जाणून घ्या हवामान अंदाज

| Updated on: Nov 22, 2022 | 9:25 AM

Napier Weather Report : जाणून घ्या हवामान अंदाज

IND vs NZ: आज होणार T20 मालिकेतील निर्णायक सामना, जाणून घ्या हवामान अंदाज
ind vs nz
Follow us on

मुंबई : न्यूझिलंडमध्ये (NZ) सध्या अनेक ठिकणी पाऊस सुरु आहे. टीम इंडियाचा आज T20 मालिकेतील निर्णायक सामना नेपियार (Napier) या ठिकाणी होणार आहे. भारतीय वेळेनुसार आज दुपारी बारा वाजता सामना सुरु होईल. आजच्या सामन्यात दोन्ही टीममध्ये बदल पाहायला मिळणार आहे. न्यूझिलंड टीममध्ये आज कर्णधार विल्यमसन (Kane Williamson) खेळणार नाही. त्याचबरोबर टीम इंडियामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

T20 मालिकेतील पहिला सामना मुसळधार पावसामुळे रद्द झाला होता. दुसरा सामना टीम इंडियाने चांगली खेळी करुन जिंकला. त्यामुळे आजच्या निर्णायक सामन्यात टीम इंडिया कशी कामगिरी करणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. हार्दीक पांड्याच्या नेतृत्वात पहिल्यांदा टीम इंडियाने न्यूझिलंड दौऱ्यावर गेली आहे.

न्यूझिलंडमध्ये सध्या स्वच्छ हवामान आहे, सायंकाळी ढग जमा होण्याची शक्यता आहे. जरी ढग जमा झाले, तरी पाऊस पडण्याची शक्यता नसल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आजच्या मॅच होणार हे निश्चित आहे. विल्यमसन नसताना टीम साऊदीकडे न्यूझिलंड टीमचे नेतृत्व देण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

भारताचा संभाव्य संघ:

इशान किशन, ऋषभ पंत , सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, हार्दिक पांड्या (कर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज आणि युझवेंद्र चहल.

न्यूझीलंडचा संभाव्य संघ:

फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे , मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साउथी, इश सोधी, अॅडम मिल्ने आणि लॉकी फर्ग्युसन.