नवी दिल्ली : भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात आत्तापर्यंत एकदम चांगले सामने झाले आहेत. दोन्ही देशांच्या चाहत्यांना आपला संघ जिंकावा असं वाटतं असल्याचे दोन दिवसापुर्वी झालेल्या सामन्यात पाहायला मिळाले. आता ही चुरस तुम्हाला सोशल मीडियावर अधिक पाहायला मिळते. तसेच दोन दिवसापुर्वी झालेल्या मॅचमध्ये भारतीय संघाने अंतिम षटकात उत्तम कामगिरी केली आणि विजयावर शिक्का मोर्तब केले. विशेष म्हणजे सध्या सुरु असलेल्या आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान संघ एकमेकांच्या समोर असल्याने या स्पर्धेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. भारतीय संघातील रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) हा फिरकीपट्टू जखमी झाला आहे. त्यांच्या जागेवरती कोणत्या नव्या खेळाडूला संधी मिळणार याकडे सगळ्या क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
रविवारी भारतीय संघाची पुन्हा पाकिस्तान संघाबरोबर मॅच होणार आहे. पहिल्या मॅचमध्ये पाकिस्तानचा पराभव झाल्याने भारतीय चाहत्यांनी रात्री उशिरा जल्लोष साजरा केला. परंतु आता दुसऱ्या मॅचपुर्वी भारतीय संघातील महत्त्वाचा फिरकीपट्टू रविंद्र जडेजा जखमी झाला आहे. आशिया चषकात त्याने आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. आता भारतीय संघात त्याच्या जागेवरती कोणाला संधी मिळणार हे पाहावे लागणार आहे. जडेजाच्या जाग्यावरती अक्षर पटेलला संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रविंद्र जडेजाच्या पायाला दुखापत झाली आहे. गोलंदाजी करीत असताना त्यांच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला आशिया चषक अर्ध्यात सोडावा लागला आहे. आशिया चषक सुरु झाल्यापासून चांगले सामने सुरु झाले आहेत. आशिया चषक कोण जिंकणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. उद्याच्या मॅचमध्ये पाकिस्तान विरोधात कोणत्या खेळाडूला संधी मिळणार हे सकाळी स्पष्ट होईल अद्याप अक्षर पटेल यांचं नाव चर्चेत आहे.