IND vs PAK: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापुर्वी रोहित शर्माने दिलं बाबर आझमला टेन्शन

| Updated on: Oct 15, 2022 | 3:34 PM

रोहित शर्माचं उत्तर ऐकल्यानंतर बाबर अझमचा चेहरा एकदम पडला होता. २३ ऑक्टोबरला टीम इंडियाची पाकिस्तानविरुद्ध मॅच होणार आहे.

IND vs PAK: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापुर्वी रोहित शर्माने दिलं बाबर आझमला टेन्शन
Rohit sharma-babar Azam
Follow us on

उद्या ऑस्ट्रेलियात (Australia) विश्वचषक स्पर्धेला (T20 World Cup 2022) सुरुवात होत आहे. त्यामुळे सोळा टीममधील सगळ्या खेळाडूंनी चांगली तयारी केली आहे. ऑस्ट्रेलियातील खेळपट्टी तेज बॉलरसाठी अधिक फायद्याची ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक टीममध्ये तेज गोलंदाजांना संधी देण्यात आली. काल विश्वचषक स्पर्धेत सहभागी झालेल्या टीमच्या कर्णधारांना बोलण्याची संधी देण्यात आली. त्यावेळी रोहित शर्माने (Rohit Sharma) पाकिस्तानच्या कर्णधाराला टेन्शन दिलं

पाकिस्तानचा कर्णधाराला ज्यावेळी त्याच्या भारताविरुद्ध सामन्याविषयी प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी बाबर आझमने उत्तर दिल की आम्ही आमची बाजू मजबूत केली आहे. त्यावर रोहित शर्माने त्याला आम्ही घाबरत नाही असं उत्तर दिलं.

रोहित शर्माचं उत्तर ऐकल्यानंतर बाबर अझमचा चेहरा एकदम पडला होता. २३ ऑक्टोबरला टीम इंडियाची पाकिस्तानविरुद्ध मॅच होणार आहे.

हे सुद्धा वाचा

पाकिस्तान टीम

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद , फखर जमान.

टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विश्‍व के.), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.