मुंबई : भारत आणि पाकिस्तानमध्ये महिला टी-20 वर्ल्ड कप 2023 मधील पहिला सामना होणार आहे. केपटाऊन येथील न्यूलँड्स मैदानावर सायंकाळी 6.30 वाजता सामना सुरू होईल. भारतीय संघाच्या कर्णधारपदी हरमनप्रीत कौर आणि पाकिस्तान संघाचं बिस्माफ मारूफ नेतृत्त्व सांभाळत आहे. दोन्ही संघांमधील मागील हेड टू हेड रेकॉर्ड पाहिले तर आकडीवारी काय सांगते आपण पाहणार आहोत.
आयसीसी वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान आतापर्यंत 13 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये भारतीय महिला संघाने आतपर्यंत तब्बल 10 सामने जिंकले आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तान संघाने फक्त 3 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. महिला टी-20 वर्ल्ड कपमध्ये एकूण 6 वेळा हे दोन्ही संघ आमने-सामने आले आहेत. यामध्येही पाकिस्तान संघाला दोन सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. भारताने चारवेळा पाकिस्तान संघाचा पराभव केला आहे. पहिला आंतरराष्ट्रीय टी-20 सामना 2009 खेळवण्यात आला होता ज्यामध्ये भारतीय संघाने 4 विकेट्सने विजय मिळवला होता.
भारतीय महिला संघाचा पाकिस्तानविरुद्ध 137 सर्वोच्च स्कोर आहे. जो 2018 साली झालेल्या वर्ल्ड कपवेळी केला होता. तर पाकिस्तान संघाचा 137 सर्वोच्च स्कोर आहे. 2012 च्या आशिया कपच्या फायनलमध्ये भारताने पाकिस्ताना संघाला अवघ्या 68 धावांवर गुंडाळलं होतं. मिताली राज ही पाकिस्तानविरूद्ध वैयक्तिक सर्वोच्च धावांची खेळी करणारी खेळाडू आहे. 2016 च्या आशिया कपच्या फायनलमध्ये मिताली राजने नाबाद 73 धावा केल्या होत्या.
दरम्यान, आजच्या सामन्यामध्ये भारताची महत्त्वाची महिला खेळाडू स्मृती मंधाना दुखापतीमुळे खेळणार नाही. स्मृती मॅचविनर खेळाडू असून तिने अनेक सामने एकहाती फिरवत भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे. आजच्या सामन्यात कोण बाजी मारतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया, रिचा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवानी, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, राजेश्वरी गायकवाड.
पाकिस्तानः बिस्माह मारूफ (कर्णधार), आलिया रियाझ, आयमान अन्वर, आयशा नसीम, फातिमा सना, जवेरिया खान, मुनीबा अली, सदफ शम्स, नशरा संधू, निदा दार, ओमामा सोहेल, सादिया इक्बाल, सिद्रा अमीन, सिद्रा नवाज, तुबा हसन.