मुंबई: भारत (IND) आणि पाकिस्तान (PAK) यांच्यात नेहमी तणावाचे वातावरण राहिले आहे. त्यामुळे राजकीय गोष्टीचा पुर्णपणे खेळावर परिणाम झाला आहे. टीम इंडियामधील खेळाडू पाकिस्तानमध्ये जात नाहीत, आणि पाकिस्तानचे खेळाडू टीम इंडियामध्ये येत नाहीत. अंध T20 विश्वचषक स्पर्धा (Blind T20 World Cup) टीम इंडियामध्ये होणार आहे. त्यामध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंना गृह मंत्रालयाने संधी देण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे होणाऱ्या अंध T20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचे खेळाडू खेळताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
ब्लाइंड टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तान टीमला भारतात यावे लागणार आहे. काल अशी माहिती जाहीर झाली होती, की पाकिस्तानच्या खेळाडूंना व्हिसा मिळालेला नाही. परंतु आता अशी माहिती समोर आली आहे, की गृह मंत्रालयाने शेजारील सर्व देशातील खेळाडूंना भारतात येण्यास परवानगी दिली आहे.
आता पाकिस्तानमधील 34 सदस्य भारतात येण्याचा रस्ता स्पष्ट झाला आहे. पीटीआयने जाहीर केलेल्या माहितीनुसार गृह मंत्रालयाने अंध T20 विश्वचषक स्पर्धेसाठी सगळ्या खेळाडूंना खेळण्याचा मार्ग मोकळा केला आहे.
ब्लाइंड टी-20 विश्वचषक स्पर्धा 5 डिसेंबरपासून सुरु झाली आहे. 15 डिसेंबरला सेमीफायनल मधील मॅच होणार आहे. त्यानंतर 17 डिसेंबरला बेंगलोरमध्ये फायनल होणार आहे. राजधानी दिल्ली, फरीदाबाद, मुंबई, इंदौर आणि बेंगलुरु या ठिकाणी विश्वचषक स्पर्धेतील सामने होणार आहेत. बांग्लादेश, नेपाल, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि साउथ अफ्रीका इत्यादी टीम विश्वचषक स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत.