मुंबई : भारतीय संघ (Indian Cricket Team) झिम्बाब्वेविरुद्ध (Zimbabwe) 3 वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील तीनही सामने हरारे येथे होणार आहेत. यावेळी भारतीय संघासोबत प्रशिक्षण राहुल द्रविड (Rahul Dravid) भारताचा नियमित प्रशिक्षक असणार नाही. विशेष म्हणजे झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत माजी भारतीय क्रिकेटर व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून असेल. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ही घोषणा केली आहे. यापूर्वी आयर्लंडविरुद्धच्या मालिकेतही व्हीव्हीएस लक्ष्मण भारतीय संघाचे प्रशिक्षक होते.
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना 18 ऑगस्ट रोजी खेळवला जाणार आहे. त्याचवेळी, दुसरी वनडे 20 ऑगस्टला तर शेवटची वनडे 22 ऑगस्टला खेळवली जाईल. या मालिकेतील सर्व सामने हरारे क्रिकेट मैदानावर होणार आहेत. भारत आणि झिम्बाब्वे मालिकेतील सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 12.45 वाजता सुरू होतील.
तसेच कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत, अष्टपैलू रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांसारखे नियमित खेळाडू झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघात नसतील. तर भारतीय संघ शेवटचा 2016 मध्ये झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यावर केएल राहुल भारतीय संघाचा कर्णधार असेल, तर शिखर धवन उपकर्णधाराच्या भूमिकेत असेल हे दौऱ्यासाठी विशेष आहे.