मुंबई : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियासाठी (India Tour Australia) वाईट बातमी आहे. टीम इंडिया आधीच अडचणीत आहे. त्यात या बातमीमुळे टीम इंडियाच्या अडचणीत भर पडली आहे. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला (Bhuvneshwar Kumar)दुखापतीमुळे क्रिकेटपासून आणखी 3 महिने दूर रहावे लागणार आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी ही बातमी चिंतेत भर टाकणारी आहे. (India bowler Bhuvneshwar Kumar has been ruled out of cricket for a few months due injury)
भुवनेश्वर कुमारला आयपीएलच्या 13 व्या मोसमादरम्यान दुखापत झाली होती. भुवनेश्वर तेव्हापासून क्रिकेटपासून दूर आहे. भुवनेश्वर दुखापतग्रस्त होऊन आता 3 महिने होत आहे. तरीही भुवनेश्वर या दुखापतीतून सावरला नाही. त्यामुळे भुवनेश्वरला आणखी 3 महिने लागणार आहे. म्हणजेच एकूणच भुवनेश्वरला 6 महिन्यांपासून दूर रहावे लागणार आहे.
आयपीएलच्या 13 व्या मोसमात 2 ऑक्टोबरला चेन्नई सुपर किंग्जस विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना खेळण्यात आला. या सामन्यादरम्यान गोलंदाजी करताना भुवनेश्वरच्या मांडीचे स्नायू दुखावले गेले. या दुखापतीमुळे भुवनेश्वरला आयपीएलच्या 13 व्या मोसमाला मुकावे लागले.
भुवनेश्वरला दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकावे लागले. त्यात आता भुवनेश्वरला आणखी 3 महिने क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे. यामुळे भुवनेश्वरला इंग्लंडविरोधातील मालिकेलाही मुकावे लागणार आहे. फेब्रुवारी महिन्यात इंग्लंड भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात टीम कसोटी, एकदिवसीय आणि टी 20 मालिका खेळण्यात येणार आहे.
भुवनेश्वर सध्या बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट एकॅडमीत आपल्या फिटनेसवर काम करतोय. भुवनेश्वर आयपीएलच्या आगामी 14 व्या मोसमापर्यंत सावरेल. तसेच तो आयपीएलमध्ये खेळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
टीम इंडियाच्या मागे दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. आयपीएलमध्ये भुवनेश्वर कुमार आणि इशांत शर्मा हे दोघे दुखापतग्रस्त झाले. या दुखापतीमुळे दोघांना ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकावं लागलं. त्यात आता ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या कसोटीत मोहम्मद शमीला दुखापत झाली. शमीच्या उजव्या हाताच्या मनगटाला फ्रॅक्टर झालं. यामुळे शमीला 6 आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे टीम इंडिया अडचणीत सापडली आहे.
संबंधित बातम्या :
England Tour India | इंग्लंडच्या भारत दौऱ्याची घोषणा, ‘या’ 3 स्टेडियमध्ये खेळण्यात येणार सामने
(India bowler Bhuvneshwar Kumar has been ruled out of cricket for a few months due injury)