ब्रूsssम…! Formula E वर्ल्ड चॅम्पियनशिपचा थरार हैदराबादमध्ये रंगणार, काय आहे स्पर्धेची खासियत जाणून घ्या

| Updated on: Feb 09, 2023 | 6:24 PM

FIA Formula E World Championship: स्पर्धेसाठी 2.8 किलोमीटरचा 18 वळणं असलेला ट्रॅक सज्ज असून या ट्रॅकवर गाड्यांचा थरार रंगणार आहे. ही स्पर्धा एकावेळी 20 हजार प्रेक्षक पाहू शकतात. 11 फेब्रुवारी 2023 रोजी ही स्पर्धा हैदराबादमध्ये असणार आहे.

ब्रूsssम...! Formula E वर्ल्ड चॅम्पियनशिपचा थरार हैदराबादमध्ये रंगणार, काय आहे स्पर्धेची खासियत जाणून घ्या
फॉर्म्युला E वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी हैदराबादमधील ट्रॅक सज्ज, थरार पाहण्यासाठी मोजावे लागणार इतके पैसे
Follow us on

मुंबई: भारतात पहिल्यावहिल्या फॉर्म्युला ई वर्ल्ड चॅम्पियनशिपचं आयोजन करण्यात आलं आहे. 11 फेब्रुवारी रोजी ही स्पर्धा होणार असून थरार पाहण्यासाठी रेसप्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता आहे. ABB FIA फॉर्म्युला ई वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेचं आयोजन हैदराबादमध्ये करण्यात आलं आहे. हैदराबादमधील हुसैन सागर तलावाशेजारी या स्पर्धेसाठी खास ई प्रिक्स रेस ट्रॅक तयार करण्यात आला आहे. 2.8 किलोमीटरचा 18 वळणं असलेला ट्रॅक यासाठी सज्ज असून या ट्रॅकवर गाड्यांचा थरार रंगणार आहे. ही स्पर्धा एकावेळी 20 हजार प्रेक्षक पाहू शकतात.सर्वसामान्य तिकीटाची किंमत 1000 ते 4000 रुपयांच्या दरम्यान आहे. मात्र ही तिकीट आधीच संपल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आलं आहे. दुसरीकडे, प्रिमियम ग्रँडस्टँडचं तिकीट 7000 रुपये, Ace ग्रँडस्टँडची किंमत 10500 रुपये इतकी आहे. तर Ace लाउंज पॅकेजसाठी 1.25 लाख रुपये मोजावे लागतील.

फॉर्म्युला ई आणि इतर कोणत्याही मोटरस्पोर्टमधील प्रमुख फरक म्हणजे कार. या स्पर्धेतसाठी सर्व कार इलेक्ट्रिक आहेत आणि 250kW बॅटरीने धावणार आहे.या बॅटरीची क्षमतेने गाडी 280km/h वेगाने धावू शकते. तसेच या वेगामुळे कारच्या आवाजाची पातळी फक्त 80 डेसिबलपर्यंत पोहोचते.फॉर्म्युला ई शर्यतीतील 11 संघ आणि 22 ड्रायव्हर्स सहभागी होतील. पोर्शे, जग्वार, निसान आणि महिंद्रा या गाड्या या स्पर्धेत भाग घेतील.

स्पर्धेचं स्वरुप आणि रेसिंग ट्रॅक

हैदराबाद ई-प्रिक्स आयोजित करणारे 30 वं शहर आहे. जग इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत असताना स्पर्धेतही बदल होताना दिसत आहे. फॉर्म्युला E मधील ‘E’ म्हणजे इलेक्ट्रिक असा आहे. तर फॉर्म्युला 1 ही स्पर्धा इंधनावर धावणाऱ्या गाड्यांना समर्थित करते. फॉर्म्युला E वर्ल्ड चॅम्पियनशिप संपूर्णपणे कार बॅटरीद्वारे समर्थित आहे. फॉर्म्युला E वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी 18-वळणं, 2.835-किमीचा रेस ट्रॅक तयार करण्यात आला आहे.

स्पर्धकांमध्ये कोणी भारतीय आहे का?

या स्पर्धेत थेट कोणत्याही भारतीय रेसरचा समावेश नाही. पण महिंद्रा रेसिंग पॅडॉकमध्ये जेहान दारुवाला याचा समावेश आहे. दुसरीकडे टाटाच्या मालकीचा जग्वार टीसीएस रेसिंग संघ देखील आहे. स्पर्धेत भारतीय ड्रायव्हर नसले तरी संघ असल्याने स्पर्धेचा आनंद लुटता येईल. या स्पर्धेचे आतापर्यंत 9 सीझन पार पडले आहेत. पास्कल वहर्लेन  (TAG Heuer Porsche) आणि जेक डेनिस (Avalanche Andretti) यांनी आतापर्यंतच्या प्रत्येक शर्यतीत विजयासाठी झुंज दिली आहे. तर निओम मॅकलॅरेन आणि जॅग्वॉर टीसीएल रेसिंगने हंगामाची सुरुवात जोशाने केली आहे. त्यामुळे ही स्पर्धा जसजशी पुढे जाईल, तसा या स्पर्धेत लक्षणीय बदल दिसून येईल.